महाराष्ट्रसातारासामाजिक

वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे कर्मचाऱ्याकडून करून घेतली जातात खाजगी कामे

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ 

केळघर.दि.३०. जावली तालुक्यातील केळघर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर येत असून एक वैद्यकीय अधिकारी दवाखान्यातील कर्मचाऱ्यांकडून आपली खाजगी कामे करून घेतात,त्यातील एक घडलेले उदाहरण आरोग्य केंद्रातील कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्याला कामकाजाच्या वेळेत आपली स्वतःची रुग्णालयाच्या आवारात खाजगी गाडी धुण्यास लावली होती.असे अनेक प्रकारची खाजगी कामे तेथील कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय अधिकारी करून घेतात.

कामकाजाच्या वेळेत वैद्यकीय अधिकाऱ्याची खाजगी गाडी धुताना कर्मचारी

ग्रामीण भागात साथ रोगाने डोके वर काढले असून यातच परिसरातील गोर गरीब जनतेच्या हाताला काम नाही हातात पैसा नाही.आजारी पडल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्राशिवाय पर्याय नसल्याने या आरोग्य केंद्रात उपचारासाठी रूग्ण दाखल होतात मात्र याठिकाणी
रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे.
केळघर परिसातील जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्रा शिवाय पर्याय नाही. येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व सुविधा उपलब्ध असून सुद्धा दुर्लक्षित धोरणामुळे येथिल वैद्यकीय अधिकारी यांचा मनमानी कारभार सुरू आहे.रात्रीच्या वेळेस कोणतेही डॉक्टर उपलब्ध राहत नाही. असेलच तर काही कारण सांगून पेशंटला पुढे जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे केळघर गावासह परिसरातील रुग्णांची मोठे हाल होत असून आल्या पावली उपचाराविना परत जावे लागते. कधी रात्री बेरात्री प्रसूतिचे रुग्ण अथवा जास्त प्रकृती बिघडलेले रुग्ण या ठिकाणी आणल्यास या ठिकाणी कधीच जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी हजर राहत नसल्याने रुग्णा सह सोबतच्या नातेवाईकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
या आरोग्य केंद्राला मोठा परिसर जोडला असला तरी वैद्यकीय अधिकारी आपला पगार घेऊन कर्तव्य बजाविताना दिसून येत नाहीत,या वैद्यकिय अधिकाऱ्यांना रुग्णांशी काहीही देणेघेणे नाही या आविर्भावात वावरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र असले तरी याठिकाणी २४ तास आरोग्य सेवा मिळणे आहे. मात्र या आरोग्य केंद्राकडे आरोग्य अधिकारी यांचेही दुर्लक्ष असल्याने येथिल वैद्यकीय अधिकारी यांची मनमानी वाढली असल्याने लोकप्रतिनिधीनी येथिल विष्कळीत झालेली आरोग्य यंत्रणेवर लक्ष देवून परिसरातील रुग्णांना हक्काची आरोग्य सेवा पुरवावे अशी मागणी येथिल नागरिकांमधून होत आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्याची खाजगी गाडी धुताना कर्मचारी

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!