महाराष्ट्रसातारासामाजिक

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन….

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ

सातारा दि.३. उद्योग, व्यवसायात क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारी सर्वसमावेश योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या योजनेचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापकांनी केले आहे.
योजना अंमलबजावणी यंत्रणा : जिल्हा उद्योक केंद्र, सातारा व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सातारा. योजनेंतर्गत प्रकल्प किंमत मर्यादा :- प्रक्रिया निर्मिती प्रकल्पांसाठी कमाल रु. 50 लक्ष व सेवा उद्योग प्रवर्गातील प्रकल्पांसाठी रु. 10 लक्ष. लाभार्थी पात्रता : सर्वसाधारण अर्जदाराचे वय 18 ते 45 वर्षे (अनुसूचित जाती/जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांना वय 18 ते 50 पर्यंत) कर्ज रु. 10 लक्ष ते 25 लक्ष पर्यंत कमीत कमी शिक्षण सातवी पास, कर्ज रु. 25 लक्ष ते रु. 50 लक्ष पर्यंत कमीत कमी 10 वी पास. वार्षिक उत्पन्नाची अट नाही. वैयक्तीक, भागिदारी, वित्तीय संस्थांनी मान्यता दिलेले बचत गट, संस्था सोसायटी, स्वयंसहाय्यता बचत गट, नवीन उद्योगासाठी योजना लागू आहे. कुटुंबातील एक व्यक्तीस (पती किंवा पत्नी) लाभ घेता येईल. अर्जदाराने यापूर्वी अनुदान समाविष्ट असलेल्या राज्य तसेच केंद्र शासनाच्या महामंडळाच्या योजनेतून लाभ घेतलेला नसावा. लाभार्थ्यांनी अर्ज www.maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर करावे.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी स्वगुंतवणूक 10 टक्के, शहरी भागासाठी 15 टक्के व ग्रामीण भागासाठी 25 टक्के अनुदान. शहरी भागासाठी 75 टक्के व ग्रामीण भागासाठी 65 टक्के बँक कर्ज मिळेल. विशेष प्रवर्ग (अनुसूचित जाती/जमाती/महिला/दिव्यांग/माजी सैनिक) स्वगुंतवणूक 5 टक्के, शहरी भागासाठी 25 टक्के व ग्रामीण भागासाठी 35 टक्के अनुदान. शहरी भागासाठी 70 टक्के व ग्रामीण भागासाठी 60 टक्के बँक कर्ज मिळेल. अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, प्लॉट नं. ए-13, एमआयडीसी, सातारा दूरध्वनी क्रमांक 02162-244655 येथे संपर्क साधावा.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!