महाराष्ट्रशैक्षणिकसातारा

जिल्हास्तरिय बुद्धीबळ क्रीडा स्पर्धात अहंती कदम द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – अभिजीत शिंगटे

मेढा.दि.०५ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेढा येथील विद्यार्थिनी कु.अहंती संतोष कदम हिने
जिल्हास्तरिय बुद्धीबळ क्रीडा स्पर्धात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होत आपल्या शाळेचे नाव उंचावले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सातारा जिल्हा बुद्धीबळ असोशिएशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमीत्त आयोजीत ४४ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाड जिल्हास्तरीय बुद्धीबळ क्रीडा स्पर्धेत जि.प. प्राथमिक शाळा मेढा मधील इ.७वीतील विद्यार्थिनी कु. अहंती संतोष कदम हिने इ.६ वी ते १० वी या गटात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
या यशाबद्दल गट शिक्षण अधिकारी श्री.चंदकांत कर्णेसो, विस्तार अधिकारी कल्पना तोडरमलसो, केंद्रप्रमुख अलका संकपाळ, जि.प. प्राथमिक शाळा मेढा मुख्याध्यापक श्री.नंदकुमार मोरे, सुरेश शेलार . शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!