महाराष्ट्रसामाजिक

रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये शॉर्ट फिल्म ‘ड्रीम’ ला आऊट स्टँडिंग अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – विशाल गुरव

आंधळी. दि.०५ औरंगाबाद येथे घेण्यात आलेल्या रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 24 जुलै 2022 रोजी मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे स्क्रीनिंग आणि अवॉर्ड या समारंभामध्ये फायनल राऊंड ला महादेव शिरोळकर निर्मित आणि दिग्दर्शित ड्रीम या फिल्मला आऊट स्टँडिंग अचिव्हमेंट हा पुरस्कार देण्यात आला.
या ड्रीम फिल्मचे लेखन सीमा दडस यांनी केले असून मुख्य कलाकाराच्या भूमिकेत शांतनु सानप व चारुता घारापुरे हे आहेत. तर सहकार जयवंत वायदंडे, वैशाली कांबळे, दीपिका मोरे, व विद्याधर गायकवाड यांनी या फिल्म मध्ये भूमिका साकारले आहेत. तसेच डीओपी चे काम पोपट सानप व सहाय्यक दिग्दर्शक रमेश शिंदे, संकलन संकेत कचरे ,एस.कमलाकर यांनी केले असून प्रोडक्शन मॅनेजर ऐश्वर्या कदम यांनी केले आहे. त्याचबरोबर वेशभूषा सीमा जाधव, प्रोडूसर माहेश्वरी जाधव. तर पीआरओ ऐश्वर्या कदम यांनी पाहिले.
तेराशे फिल्म मधून अंतिम फेरीत धडक मारणारी ड्रीम ही फिल्म समाजाला संदेश देणारी ठरणार आहे. या फिल्मचे चित्रिकरणाचे काम कराड परिसरात झाले आहे. या शॉर्ट फिल्मला अभूतपूर्व यश लाभले आहे. त्यामुळे ड्रीम या फिल्मचे संपूर्ण स्तरातील लोकांनकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सदर फिल्म ला मिळालेला पुरस्कार हा पहिलाच असून अनेक ठिकाणी की फिल्म अनेक पुरस्कार प्राप्त करेल यात शंका नाही. एक चांगला सामाजिक विषय निर्माते महादेव शिरोळकर यांनी या चित्रपटांमध्ये मांडलेला आहे. वेगवेगळ्या विषयावरती अशाच प्रकारचे दर्जेदार चित्रपट बनवण्याचा मानस आहे.

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल औरंगाबाद च्या यशानंतर शॉर्ट फिल्म, ड्रीम ला बीड येथे दिनांक -28 जुलै 2022 रोजी झालेल्या
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये स्क्रीनिंग साठी सर्वोत्कृष्ट दहा फिल्ममध्ये निवड झाली आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट बाल कलाकारांचे नॉमिनेशन झाले. या फेस्टिवल मध्ये परीक्षकांनी व प्रेक्षकांनी अतिशय कौतुकास्पद सर्टिफिकेट प्रदान केले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!