बोंडारवाड़ी ते पोलादपुर महामार्गापर्यंत बोगदा होण्याबाबत जिल्हाधिकारी यांना मागणीचा दिला प्रस्ताव

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज – युवराज धुमाळ
मेढा. दि.०६.जावली तालुक्यातील म्हाते खुर्द येथील नेहरू युवा मंडळाच्या वतीने बोंडारवाड़ी ते पोलादपुर महामार्गापर्यंत बोगदा होण्याबाबत जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदन देण्यात आले.
रस्ता तिथे विकास हे समीकरण काय आता नविन नाही, या अनुषंगाने नेहरू युवा मंडळ म्हाते खुर्द आणि छत्रपती शासन यांच्या मार्फत जिल्ह्याधिकारी कार्यालयात बोंडारवाडी – पोलादपूर बोगद्याची संकल्पना आणि मागणी प्रस्ताव देण्यात आला.
मुंबई पुणे – कोल्हापुर एकस्प्रेस वरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल तसेच सातारा पोलादपूर – मुंबई महामार्ग विकास झाला तर जावली,महाबळेश्वर तालुक्याचा सार्वांगीन विकास होण्यास मदत होईल.
प्रवास करताना मुंबई एक्सप्रेस वरून आज ट्रॅफिक जामचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे,वाहतुकीचा मुंबई ते पोलादपूर सातारा या रस्त्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच मुंबई पुणे एकस्प्रेस वरील बरीचशी वाहतूकोंडी कमी होण्याचा प्रयत्न होईल.




