महाराष्ट्रसातारासामाजिक

” मिशन धाराऊ” अभियानामध्ये जावली जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर राहील….रोहिणी ढवळे

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क


मेढा.दि.०६.” मिशन धाराऊ” माता दुग्धामृतम् “अभियानाचा जावली तालुक्यात प्रभावी पणे शुभारंभ झाला असून या अभियानात जावली तालुका जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकावर राहील ‘ असे गौरवोद्गार सातारा जिल्हा परिषदेच्या बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांनी काढले.
मेढा येथील कलश मंगल कार्यालयामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाच्या मेढा , केळघर , कुसुंबी बीट च्या वतीने मिशन धाराऊ मातादुग्धामृतम् या मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांचे प्रमुख उपस्थीती मध्ये करण्यात आले होते . याप्रसंगी तहसिलदार राजेंद्र पोळ , गट विकास अधिकारी रमेश काळे, प्रकल्प अधिकारी संदीप भिंगारे , अंगणवाडी महिला पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पार्टे ,माजी नगरसेविका पुष्पा तांबोळी, जवळवाडी सरपंच सुरेखा मर्ढेकर, विस्तार अधिकारी शाम राठोड, सामाजीक वनीकरण विभागाच्या वनपाल सुनिता जाधव, शिक्षण विभागाच्या योगिता जगताप आदी मान्यवर उपस्थीत होते.
या अभियानाच्या शुभारंभा प्रसंगी उपस्थीत अंगणवाडी सेविका ,मदतनिस, व माता पालक यांना मार्गदर्शन करताना रोहिणी ढवळे पूढे म्हणाल्या, आईच्या दुधाचे महत्व माता जिजाऊंना ज्ञात होते . म्हणून बाळ शंभूराजेंचे संगोपन दुग्धमाता धाराऊच्या दुधावर केले .आईचे दुध अनमोल आहे. आपल्या बाळासाठी हिरकणीने अंधाऱ्या रात्री गडाचा कडा उतरला होता.
बालकाच्या सर्वांगिण विकासामध्ये त्याच्या शारिरीक विकासाचे महत्व हे खूप मोलाचे आहे. कुपोषणाच्या समस्येवर मात कर०यासाठी बालकाची सुदृढ शारिरीक वाढ व विकास हे प्रभावी घटक आहेत. त्यासाठी मातेचेच दुध महत्वाचे आहे. स्तनपान विषयात जनजागृती व्हावी व सशक्त लोकचळवळ उभी राहावी यासाठी ” मिशन धाराऊ, मातादुग्धामृतम् ” हि योजना शासनाने सुरू केली आहे . या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जावली सातारा जिल्हयामध्ये प्रथक क्रमांकावर असून जिल्हाही राज्यात प्रथम क्रमांकावर राहील असा विश्वास व्यक्त करून या कार्यक्रमाचे प्रभावी पणे ,व निटनेटके नियोजन केल्याबध्दल सर्व संयोजकांना धन्यवाद दिले. व कार्यक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.
या प्रसंगी तहसिलदार राजेंद्र पोळ गटविकास अधिकारी रमेश यांनी आपल्या मनोगतातून अभियानास शुभेच्छा दिल्या. तर कार्यक्रमात राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. तसेच आंतरराष्ट्रीय स्तनपान तज्ञ डॉ. महिमा पंडित यांनीही आपल्या व्याख्यानातून मानवीय दुग्ध पेढीचे महत्व पटवून दिले.
प्रकल्प अधिकारी संदिप भिंगारे यांनी या प्रसंगी बोलताना धाराऊ मिशन अभियान गावपातळीवर तसेच सर्व बिटमध्ये प्रभावीपणे राबण्याबाबत सुचना केल्या. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ढवळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका मानसी संकपाळ, मनिषा पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तम अशा कार्येक्रमाचे नियोजन केल्याबद्धल तोंडभरून कौतुक केले.
प्रारंभी राजमाता जिजाऊ , सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पुजन तसेच दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला . तर सेल्फी पॉईंट याचेही उद्घाटन करण्यात आले . पोषण आहार कट्टयाचे तसेच संबधीत विषयाच्या विविध रांगोळ्यांची पाहाणी करुन ढवळे मॅडम यांच्या हस्ते गरोदर मातेची ओटी भरण करण्यात आली. उपस्थितांचे वतीने धाराऊ मिशन संबधी शपथ घे०यात आली.

तर अंगणवाडी सेविका,मदतनिस यांनी या मोहिमेसंदर्भात पोवाडा, लोकागित , उखाणे, तर नाटीका रूपाने बोलक्या बाहुल्यांच्या शोचे सादरीकरण केले. या कार्यक्रमात सर्व प्रकारच्या पोषक फळ व पालेभाज्या , विविध पदार्थ , अन्न घटक यांचे माहिती फलकासह सादरीकरण करण्यात आले होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका मानसी संकपाळ यांनी तर सुत्रसंचलन मनिषा पवार यांनी केले कार्येक्रमास पर्यवेक्षीका बेबी कांबिरे , बी. ए. कारंडे , संगीता सावंत , सुजाता कदम , पत्रकार सोमनाथ साखरे संदीप क्षीरसागर ,यांच्यासह मेढा , केळघर , कुसुंबी बीटमधील गरोदर , माता पालक महिला, सेविका मदतनिस मोठया संख्येने उपस्थीत होत्या. कार्यक्रम यशस्वी कर०यासाठी पर्यवेक्षिका ,सेविका, मदतनिस यांनी विशेष परिश्रम घेतले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!