
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज – युवराज धुमाळ
केळघर.दि.२३.महाराष्ट्राची शान,मुंबईची जान आणि भारतमातेचा अभिमान,असलेला हा वडापाव त्याचा तेविस आँगष्ट हा वाढदिवस.त्यानिमित्त तोंडाला पाणी सुटनारं थोडं काही…
आज महाराष्ट्रात आल्यावर विशेष करून मुंबई पुण्यात नव्हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वडापाव खाल्ला नाही. असा एकही गरीब श्रीमंत.अबाल व्रुध्द सापडनार नाही.पुर्वी केळीला जसं गरीबाचं अन्न म्हंटलं जायचं तसच आज गरीबाचा नाष्टा म्हणून महाराष्ट्रात बटाटा वड्याकडे पाहीले जाते. नव्हे,तो खाल्लाच जातो.केळी जशी एक जरी खाल्ली ,तरी पोठ भरते .त्या प्रमाणे एखादा वडापाव जरी दिवसातून खाल्ला पोटात ढकलला,तरी दिवसभर परत पोटाकडे पहायाची गरज पडत नाही. असा हा वडापाव गरीबाच्या डब्यातील पुर्णान्न म्हंटलं, तरी वावगं ठरणार नाही.
असा हा वडापाव नव्वदीच्या दशकात वयात आला.नव्हे रस्त्यावर आला.त्या पुर्वी तो हाँटेल मध्ये वडासांबर रूपात मिळत होता.ज्याला हा पदार्थ माहीत होता तोच ग्राहक हाँटेल मध्ये वडासांबर मागायचा.वडापावच्या आधी भज्जी,कांदाभजी फार फेमस असायची .छोट्या हाँटेलपासुन अगदी भव्य रेस्टॉरंटमध्ये सहज मागितलेला पदार्थ म्हणजे भजी असायचा.नव्हे ज्या हाँटेल मध्ये भजी नाहीत. अशा हाँटलला हाँटेलच म्हणता येत नसायचं.हाँटलला जायचं तर भज्जी खायचं असं पुर्वी हाँटेलचं सुत्र होतं.पण एकोणीसशे नव्वद च्या काळात बटाट्यावड्याने आपला द्रुष्टीकोन बदलला.आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील वाडी,वस्ती, रस्ता, महामार्ग आणि टपरी ते त्रीस्टार, फाईव्ह स्टार हाँटेल मध्ये किचनकिंग बणला.त्याला कारण,आज मुक्त हस्ते मिळनारा बटाटा ,पाव आणि हिरवी मिरची.
आज वडापाव जरी महाराष्ट्रात पदार्थांचा राजा असला तरी वडापाव मधील पाव मिरची मीठ जर नाहिसे झाले, तर वड्याला किंमत शुन्य आहे.वडापाव खाताना जर पाव ताजा नसेल , मऊ छिद्र युक्त नसेल तर वड्याला चव येत नाही. आणि म्हणून बटाटा वड्याइतकीच पावालही किंमत आहे.
यानंतर महत्त्व घाटावरच्या हिरवीगार ,चुटुकदार मिरचीचं ती जर नसेल.तर तोंडाला पाणीच सुटनार नाही. हिरवीगार मिरची, तिच्या वर सुरीचा वार, त्यात मिठात लोळून घोळून उकळत्या तेलात तळून जर घेतली नाही.तर वडापाव खाल्याचा आनंदच मिळनार नाही.असा हा वडापाव फलो फुलो गोरगरिबांचा खाईल त्याचा अन्नदाता आणि हजारो कुटुंबाचा पालनहार बणो हीच.या वडापावला वाढदिवसाची शुभेच्छा….
(बळवंत पाडळे, संवेदना सेवा फाउंडेशन)



