गोंदवले नाटय महोत्सवात “टेढे मेढे ” ची कमाल द्वितीय क्रमांकासह इतर बक्षिसातही दबदबा कायम

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – अभिजीत शिंगटे
मेढा( अभिजीत शिंगटे ) – गोंदवले खुर्द येथील नाटय महोत्सवाच्या माध्यमातून नागरीकांना निखळ हास्य देणारे टेढे मेढे हे धमाल नाटक द्वितीय क्रमांकाने प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले असून या नाटकाने इतर बक्षिसे मिळवून आपला दबदबा कायम राखला आहे.
श्री गोपालकृष्ण जयंती उत्सव आणि श्री. गोंदवलेकर ग्रामस्थ नाटय महोत्सव यांच्या वतीने गोंदवले खुर्द येथे नाट्य महोत्सव आयोजीत करण्यात आला होता यामध्ये मल्हार + जाई वल्लरी प्रकाशित विठू स्टुडिओ प्रस्तुत टेढे मेढे नाटक सादर करण्यात आले होते. याची संकल्पना नितीन- राजेश, यांची असून याचे निर्माते चंद्रकांत पवार आहेत.लेखक रुपेश दुदम लिखीत या नाटकात सुर्यकांत गोवळे, राजेश सपकाळ, नितीन पवार, रोहीत विचारे, वैदेही करमरकर यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडण्यात यशस्वी ठरले आहेत.
टेढे मेढे या नाटकाने द्वितीय क्रमांकाबरोबर पुरुष अभिनय प्रथम- सुर्यकांत गोवळे, उत्कृष्ट दिग्दर्शन द्वितीय – रुपेश दुदम, प्रकाश योजना- प्रथम -देवीदास शिगवण, नेपथ्य- प्रथम- आकाश शिर्के अशी बक्षिसे मिळवून आपला दबदबा राखला आहे. झी टॉकिज कॉमेडी अवॉर्डमध्ये या नाटकाची दखल घेतली असून नाटय विभागातुन सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता करीता सुर्यकांत गोवळे यांना नामांकन प्राप्त झाले आहे.

सुर्यकांत गोवळे
कलाकार
फोटो १ ) चषक स्विकारताना टेढे मेढे नाटकाचे कलाकार व सहकारी
२ ) सुर्यकांत गवाळे फोटो



