शिवसेना प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचाअमृत महोत्सवाचे औचित्य साधुन विद्यार्थी गुण-गौरव सोहळा

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज – युवराज धुमाळ
मुंबई.दि.२३. शिवसेना प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या गोरगरिबांच्या मदतीचा केंद्रबिंदू असलेल्या सामाजिक काम करणाऱ्या व सर्व शिवसैनिक असलेल्या संस्थेद्वारे देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन दि.२१/०८/२०२२ रोजी कम्युनिटी सेंट्रल हॉल, सी.जी.एस.कॉलनी,घाटकोपर (प.) येथे विद्यार्थी गुण-गौरव सोहळा तसेच विद्यार्थी मार्गदर्शन सोहळा माजी केंद्रीय कॅबिनेट अवजड उद्योग मंत्री शिवसेना मा.खासदार श्री.अनंत गीते साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.

त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ राष्ट्रीय अध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू सकपाळ, महा.शिव माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष श्री.निलेशजी भोसले, शिवसेना विभाग संघटक अंधेरी (प.) मुंबई चे श्री.संजय कदम तसेच महा.शिव माथाडी कामगार सेना उपाध्यक्ष श्री.नागेंद्र राठोड उपस्थित होते त्याचप्रमाणे मायेची सावली या संस्थेचे चे संस्थापक श्री.यशवंत खोपकर, संचालक श्री.अवी राऊत,अध्यक्ष श्री.रविंद्र जाधव, सचिव श्री.प्रमोद चौंडकर, खजिनदार श्री.गणेश काळे, सहसचिव श्री.सदाशिव लाड, सहखजिनदार श्री.राम वैद्य, श्री.विश्वनाथ जाधव, व कार्यकारिणी सदस्य श्री.संदिप चांदिवडे, श्री.बंडू चौधरी आणि कार्यालय प्रमुख श्री. विनायक जाधव व श्री.विश्वास तेली, श्री.संजय चव्हाण, श्री. घोलप साहेब, श्री.दौलत बेल्हेकरतसेच गुणवंत विद्यार्थी,पालक व शिवसैनिक कार्यकर्ते हे या सोहळ्यास उपस्थित होते.




