
स्टार११ महाराष्ट्र न्यूज — युवराज धुमाळ
मेढा. दि.१५. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याआज १५ ऑक्टोबर २०२२ रोजी जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रंथालयाकडून ग्रंथ प्रदर्शन तसेच भित्तिपत्रिकेचे उद्घाटन व वाचन कट्टा उपक्रम घेण्यात आले. तसेच ‘स्पर्धा परीक्षेचे महत्त्व आणि ग्रंथाला चा वापर’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक डॉ. सुधीर नगरकर यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकात वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व त्याचा उद्देश सांगितला. प्रमुख पाहुणे प्रा. दिनेश ताठे युनिक अकॅडमी, पुणे यांनी स्पर्धा परीक्षेचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना वाचन का केले पाहिजे. स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी ? का करावी? कधीपासून करावी? नेमके काय केले पाहिजे असे बहुमूल्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी हे होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगतात वाचाल तर वाचाल हा संदेश दिला. जावळी तालुका हा माथाडींच्या तालुका ऐवजी अधिकाऱ्यांचा तालुका कसा होईल यासाठी स्वतःपासून सुरुवात करा विद्यार्थी दशेत ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केल्यास यश हे नक्की मिळते असे मार्गदर्शन केले.

या प्रसंगी पाहुण्यांचा परिचय प्रा.प्रकाश जवळ यांनी केला.तसेच आभार प्रदर्शन डॉ.सारंगपानी शिंदे यांनी केले. याप्रसंगी शिक्षकेतर कर्मचारी वसंत धनवडे आबासाहेब देशमुख व अविनाश मदने यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचा लाभ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी घेतला.




