युनिव्हर्सल ह्युमन राईट्स कौन्सिल भारत च्या
ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ.उषा बोरुडे यांनी दिपावली निमित्त पणत्या आणि तेलाचे केले वाटप

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज — युवराज धुमाळ
मुंबई. दि.१९.युनिव्हर्सल ह्यूमन राइट्स कौन्सिल भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर तरुणजी बाकोली या राष्ट्रीय महिला अध्यक्ष श्रीमती सुमन जी मोर्या तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री मोहन सिंह ठाकुर महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सौ सुवर्णाताई कदम महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री संदीप भोज यांच्या आदेशानुसार दीपावली निमित्त सोसायटी चे वॉचमेन,सफाई कामगार ,आझादनगर येथील लोकांना पणत्या आणि तेल वाटप करण्यात आले.

दिनांक १८ ऑक्टोबर सोमवार रोजी ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ.उषाताई बोरुडे यांचे मार्फत दीपावली निमित्त विविध ठिकाणी सोसायटीचे वॉचमेन,सफाई कामगार ,आझादनगर येथील लोकांना तसेच महिलांना पणत्या आणि तेल वाटप करण्यात आले.सौ उषाताई ह्या नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.नेहमीच अशा अनेक प्रकारचे नवनवीन उपक्रम राबवून लोकांना विविध मार्गातून मदतीचा हात पुढे करतात.

या कार्यक्रमाच्या वेळेस अध्यक्षा सौ.उषाताई बोरुडे यांनी उपस्थित सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात सोसायटीतील अनेक महिलांनी सहभाग घेतला होता.





