महाराष्ट्रसातारासामाजिक

जावली तालुक्यात १५ ग्रामपंचायत निवडणूक सरपंच पदासाठी ४६ तर सदस्यपदासाठी १९० अर्ज दाखल

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज — युवराज धुमाळ


मेढा.दि.०३.राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती.जावली तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे.जावली तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी एकूण१५ जागा सदस्यपदांसाठी १०७ पदांची संख्या असून गुरूवारी दि.०२ डिसेंबर रोजी पर्यंत एकूणच सदस्य पदासाठी १९० उमेदवारी अर्ज दाखल झाले तर सरपंचपदासाठी ४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.


१५ गावातून सरपंच व सदस्य पदासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची यादी पुढीप्रमाणे रिटकवली ग्रामपंचायती साठी सरपंच पदासाठी १ अर्ज सदस्य पदासाठी ७अर्ज दाखल करण्यात आले,मोरघर ग्रामपंचायती साठी सरपंच पदासाठी ३ अर्ज सदस्य पदासाठी २०अर्ज दाखल करण्यात आले,सोमर्डी ग्रामपंचायती साठी सरपंच पदासाठी २ अर्ज सदस्य पदासाठी १५अर्ज दाखल करण्यात आले,आखाडे ग्रामपंचायती साठी सरपंच पदासाठी ३ अर्ज सदस्य पदासाठी २४अर्ज दाखल करण्यात आले,केळघर तर्फ मेढा ग्रामपंचायती साठी सरपंच पदासाठी ५ अर्ज सदस्य पदासाठी ६अर्ज दाखल करण्यात आले,ओझरे ग्रामपंचायती साठी सरपंच पदासाठी ३ अर्ज सदस्य पदासाठी १७अर्ज दाखल करण्यात आले,रुईघर ग्रामपंचायती साठी सरपंच पदासाठी०२ अर्ज सदस्य पदासाठी १२अर्ज दाखल करण्यात आले,शिंदेवाडी ग्रामपंचायती साठी सरपंच पदासाठी ०४ अर्ज सदस्य पदासाठी ०८अर्ज दाखल करण्यात आले,वालुथ ग्रामपंचायती साठी सरपंच पदासाठी ०३ अर्ज सदस्य पदासाठी १६अर्ज दाखल करण्यात आले,रामवाडी ग्रामपंचायती साठी सरपंच पदासाठी ०१ अर्ज सदस्य पदासाठी ०७अर्ज दाखल करण्यात आले,करहर ग्रामपंचायती साठी सरपंच पदासाठी ३ अर्ज सदस्य पदासाठी १७अर्ज दाखल करण्यात आले,भोगवली तर्फ कुडाळ ग्रामपंचायती साठी सरपंच पदासाठी ७ अर्ज सदस्य पदासाठी ७अर्ज दाखल करण्यात आले,वाकी ग्रामपंचायती साठी सरपंच पदासाठी १अर्ज सदस्य पदासाठी ०७अर्ज दाखल करण्यात आले,कुसुंबी ग्रामपंचायती साठी सरपंच पदासाठी ०६अर्ज
सदस्य पदासाठी २२अर्ज दाखल करण्यात आले,
घोटेघर ग्रामपंचायती साठी सरपंच पदासाठी ०२अर्ज
सदस्य पदासाठी ०५अर्ज, एकूणच १५ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी १९० उमेदवारी अर्ज दाखल झाले तर सरपंचपदासाठी ४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.


०२/१२/२०२२ अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी जावली तहसिल कार्यालयात मोठी गर्दी झाली होती.सात डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.ग्रामपंचायत निवडणूक लागली की, गावातील वातावरण ढवळून निघते. त्यातच सद्या सरपंचपदाची निवड थेट जनतेतून असल्यामुळे ‘मीच सरपंच होणार’ म्हणून अनेकांनी शड्डू ठोकलेत. त्या पद्धतीने फिल्डींग लावण्यात सुरुवात केली आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!