धार्मिकपर्यटनमहाराष्ट्रसातारा

तीर्थक्षेत्र आधी मठ संस्थान धारेश्वर येथे सालाबाद प्रमाणे धारेश्वर यात्रा महोत्सव अत्यंत वैभवशाली संपन्न

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज — युवराज धुमाळ


पाटण. दि.०२. तीर्थक्षेत्र आधी मठ संस्थान धारेश्वर येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी धारेश्वर यात्रा महोत्सव अत्यंत वैभव संपन्न झाला.अमावस्या दिवशी प्रती महिन्याप्रमाणे अभिषेक बिल्वारचन,सायंआरती अशी कार्यक्रम संपन्न झाले.देव दीपावलीच्या निमित्ताने सूर्योदयाला श्री वीरभद्र जन्मोत्सव सकाळी सात वाजता अभिषेक करण्यात आला त्यानंतर ८ ते ११ वाजेपर्यंत शिवदिक्षा समारंभ आणि सायंकाळी चार वाजेपर्यंत वेगळ्या भक्तांचे अभिषेक बिल्वारचरन असा कार्यक्रम पार पडला.


सायंकाळी साडेपाच वाजता देवाचे पालखी छबिना निघाला साडेसहा वाजता दीपोत्सव साजरा झाला रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत शिरगाव कोपी आणि चकदेव जंगम मंडळ या भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला.भजन दहा वाजेपर्यंत चालू राहिलं दहा वाजता स्थानिक दिवशी खुर्द आणि परिसरातील भजनी मंडळाने पंचपदी केली. त्यानंतर उपस्थित गुरुवर्य सद्गुरु शिंदे महाराज सद्गुरु षटस्कल ब्रह्मी महादैया रवि शंकर शिवाचार्य राय पाटणकर महाराज,सद्गुरु षटस्कल ब्रह्मी राचलिंग शिवाचार्य परणकर महाराज, आदि मठाध्यक्ष सद्गुरु पद्मभास्कर डॉक्टर निल कंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांचे आशिर्वचन संपन्न झाले.


यावेळी पाटणकर कांता सरकार,दास्तांकर, दास्तान मिरगावकर शिवंडेश्वर काठे पालखी मानकरी आणि श्रीचे पुजारी शिवलिंग जंगम यांनी गुरू प्राधी समाधी श्री धारेश्वर आणि रामास श्रीफळ ठेवून वर्षभरासाठी सर्व सदभक्ताना या देवस्थानचे सर्व छत्रपती श्रीमंत भोसले सरकार पतंगराव देशमुख सरकार आणि साळुंके पाटणकर सरकार जेधे सरकार अशा विविध सरकारांच्या आणि या साठगाव मानकरी वेगवेगळ्या गावाच्या वीरशैव लिंगायत आणि बहुजन समाज अठरापगड जाती या सर्वांच्या रक्षणासाठी श्रीफळ ठेवले आणि काठी पालखी महोत्सव संपन्न झाला.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!