जावली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक २०२२ चुरशीची
आ.शिवेद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाचे वर्चस्व कायम


मेढा.दि.२०. जावली तालुक्यात आज झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जावली मतदारसंघातील १५ ग्रामपंचायतीं पैकी १४ ग्रामपंचायतीवर आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवाद वर्चस्व राखत विरोधकांना धक्का देवून निर्विवाद वर्चस्व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राखले आहे.

तिर्थक्षेत्रचा दर्जाअसणारे आई काळेश्वरीच्या नावाने महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले कुसुंबी व जि.प.प्राथमिक शाळेचा नुकताच भारतात दुसरा नंबर आलेले ओझरे गावासह कुडाळ विभागातील मुख्यबाजार पेठेचे गाव म्हणून ओळखले जाणारे करहर तसेच भोगवली तर्फ कुडाळ येथील सरपंच पदासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या परीनं रस्सी खेच करण्यात आली होती.काही वेळ राष्ट्रवादीच्या नेत्यांना धक्काच बसला.तर दुसरीकडे भाजपने जल्लोषाला सुरवात केली.

आज सकाळी मतमोजणीला सुरवात झाली आणि विजयाचा संदेश कार्यकर्त्यांना मिळाला आणि सगळीकडे दोन्ही पक्षांचा गुलाल उधळला गेला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना जल्लोष करायला चांगली संधी मिळाली, मात्र तोपर्यंत तालुक्याच्या कुसुंबी गावाकडे सर्वांचे लक्ष लागले होते, त्या निकाल हाती आला होता तो म्हणजे सरपंच पदासाठी साधू एकनाथ चिकणे यांना एकूण ६४८ मते मिळाली व मारुती विष्णू चिकणे यांनाही एकूण ६४८ मते मिळाल्याने दोघांमध्ये अंतिम विजयाचा निर्णय होऊ शकत नसल्याने दोघांचा निर्णय निवडणूक अधिकारी यांनी चिठ्ठी द्वारे करण्याचा निर्णय घेतला, दोघा उमेदवारांना थोडा वेळ विचार करण्यास देऊन दोन उमेदवारासाठी चिठ्ठी टाकण्यात आल्या त्या पैकी एक चिठ्ठी स्वरा अतुल पुसेगावकर हिच्या हस्ते उचलण्यातआली आणि विजयाची माळ मारुती विष्णू चिकणे यांच्या गळ्यात पडली.

केळघर तर्फ मेढा येथील सौ सवीता सुनिल बेलोशे,रिटकवली येथिल सौ.शारदा सुरेश मर्ढेकर,रामवाडी येथिल श्रीरंग गलगले (काका),वाकी येथिल हरिभाऊ कदम हे थेट सरपंच पदी निवडून आलेले उमेदवार या चार ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्या.तर मोरघर,सोमर्डी, ओझरे,करहर, कुसुंबी,आखाडे, भोगवली तर्फ कुडाळ, रुईघर,घोटेघर,करहर वालुथ, येथे समोरासमोर लढती झाल्या होत्या. सरपंच पदासाठी २५ उमेदवार तर सदस्य पदांसाठी ९० उमेदवार रिंगणात उभे होते.
त्या पैकीनिवडणूक लढवून विजयी होऊन आलेले उमेदवार ओझरे येथे अजित निवृत्ती मर्ढेकर सरपंच पदी विजयी, सोमर्डी येथे ललिता शांताराम जगताप सरपंच पदी विजयी,वालुथ येथे मनिषा कमलाकर भोसले सरपंच पदी विजयी,शिंदेवाडी येथे धनंजय धोंडीराम शिंदे सरपंचपदी विजयी,आखाडे येथे सखाराम रघुनाथ गायकवाड सरपंच पदी विजयी करहर येथे सोनाली नरेंद्र यादव सरपंच पदी विजयी,मोरघर येथे शिवाजी गोविंद डोईफोडे सरपंच पदी विजयी ,रुईघर येथे अंजना अंकुश बेलोशे सरपंच पदी विजयी,घोटेघर येथे उज्वला संदिप रांजणे सरपंच पदी विजयी, भोगवली तर्फ कुडाळ येथे समीर तुकाराम गोळे सरपंच पदी विजयी.कुसुंबी येथिल सरपंच पदासाठी दोघानाही समान मतदान ६४८ झाल्याने चिठ्ठी टाकून मारूती विष्णू चिकणे विजयी झाले.

निवडणूक निरीक्षक संगीता चौगुले उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांच्यासह जावळीचे निवडूक निर्णय अधिकारी तहसिलदार राजेंद्र पोळ,तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली मेढा बाजार पेठेमध्ये शांततेत निकाल आज जाहीर झाला.



