महाराष्ट्रसातारा

विद्यार्थ्यांना मदत करत त्यांनी जागवल्या मित्राच्या स्मृती…


कास दि.३१. आपला मित्र गेला पन तो आजही आपल्यातच आहे. या भावनेतून त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ सातारा येथील नोएल डेव्हिड फ्रेंडस ग्रुप तर्फे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमामुळे डोंगर भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मात्र हसू उमटल्याचे पाहावयास मिळाले.

कुसुंबीमुरा – नोएल डेव्हिड याच्या स्मृतिनिमित्त दिलेल्या मदतीमुळे मुलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. (अर्चना पवार )

सातारा येथील नोएल डेव्हिड या तरूणाचा गतसाली चोवीस मे ला मृत्यू झाला होता. त्याच्या जन्मदिनानिमित्त सर्व मित्रांनी एकत्र येत स्वता पैसे काढून गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे ठरवले. याप्रमाणे दुर्गम कास भागातील कुसुंबीमुरा शाळेस दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी शाळेस स्पोर्टस शूज, स्कूल बॅग्ज, व वह्या,पेन, रंग खडू इ.शैक्षणिक साहित्य भेट दिले. मान्यवरांचे स्वागत कुसुंबीमुरा शाळेचे मुख्याध्यापक विनायक चोरट यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या कार्यक्रमासाठी शिंदेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक सुर्यकांत पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी रत्नाकर भिलारे, जालंदर सुतार व बाळकृष्ण जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व मदत करण्यासाठी समिना इनामदार, मंगेश जाधव, स्टेला डेव्हिड, अरूल डेव्हिड, रूबन डेव्हिड,
शितल ठोंबरे, उद्धव चव्हाण, यश चव्हाण, सनी, साहिल बागवान, पंकज माने, नोएल डिसोझा, यांच्यासह मित्रानी परिश्रम घेतले.

या ग्रुपच्या वतीने सातारा तालुक्यातील लमाणवस्ती (म्हसवे) येथील प्राथमिक शाळेस व एहसास या मतिमंद मुलांच्या संस्थेसही मदत देण्यात आली.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!