
कुडाळ.दि.१९.आज दि.१९/०२/२०२३ रोजी सायं. ०५.०० वा. चे सुमारास शिवजयंती उत्सव अनुषंगाने कुडाळ पोलीस दुरक्षेत्र हद्दीत सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर, मेढा पोलीस ठाणे यांच्या आदेशाने पो. हवालदार मेटकरी, पो. रोकडे, पो. कचरे, पो. कॉ. घोरपडे आणि होमगार्ड पथक, सातारा येथील अमर गायकवाड, सतिष नलावडे, वैभव वर्णेकर असे पेट्रोलिंग करित असताना एक इसम मोटार सायकल दारूची वाहतूक करत असताना सापडला.
पाचवड ते कुडाळ गावचे दरम्यान स्प्लेंडर मोटार सायकल वर एक इसम आपल्या पुढ्यात पेट्रोलच्या टाकीवर एक खाकी रंगाचा बॉक्स घेऊन येत असताना दिसला, त्याचा पाठलाग करून पकडले कुडाळ, ता. जावली, जि. सातारा येथील असल्याचे सांगितले, त्याच्या पुढ्यात पेट्रोलच्या टाकीवर असेलेल्या बॉक्स मध्ये काय आहे असे विचारले असता त्याने देशी दारू च्या दारूने भरलेल्या काचेच्या बाटल्या आहेत असे सांगितले, त्यास दारू वाहतुकीचा किंवा दारू जवळ बाळगण्याचा परवाना आहे काय विचारले असता असा कोणताही परवाना त्याच्या कडे आढळून आला नसल्याने त्याच्यावर कारवाई केली असून एकूण रु.३,३६९/- रू. चा दारू मुद्देमाल आणि १५,०००/- रु. किमतीची स्प्लेंडर मोटार सायकल असा असून एकूण रक्कम रु. १८,३६०/- रु. चा देशी दारूचा मुद्देमाल मोटार सायकल सह हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हवालदार मेटकरी करीत आहेत.



