आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून जावली तालुक्यातील प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहचविणार …ज्ञानदेव रांजणे

केळघर. दि.२३.गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आसणी ता. जावली व केळघर या ठिकाणी आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आमदार फंडातून मंजूर असणाऱ्या कामांचा भूमिपूजन सोहळा जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी युवा उद्योजक सागर धनावडे,जेष्ठ नेते मोहनराव कासुर्डे केळघरचे मा.सरपंच बबन बेलोशे,हरिभाऊ शेलार, सुनिल जांभळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आसनी ता जावली येथे जनसुविधा योजनेतून ग्रामपंचायत कार्यालय १२ लाखआमदार फंडातून मंदिर परिसर सुशोभीकरण करणे १०लाख.केळघर येथे बंदिस्त गटर १० लाख रुपये या कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.यावेळी बोलत असताना जावली तालुक्याचे लोकप्रिय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून जावली तालुक्यात प्रत्येक गावात वाडी वस्तीत विकासाची गंगा पोहोचवत तालुक्यातील सर्व गावे सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू असून प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयाच्या फंड उपलब्ध असून प्रत्येक गावात विकास कामे सुरू आहेत. सध्या राज्यात असलेले शिंदे फडणवीस यांचे सरकारच्या माध्यमातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावली तालुक्यासाठी प्रचंड असा निधी उपलब्ध करून दिला आहे.
प्रत्येक गावात मूलभूत सुविधा पोचवण्याचे काम आमदार साहेबांच्या माध्यमातून होत आहे. येत्या आठवड्यात केडंबे विभागाला जोडणारा नांदगणे पूनवडी पूलाचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे त्याच दिवशी आंबेघर ते बोंडारवाडी रस्ता , असनी ते म्हाते रस्ता, केळघर ते गाढवली रस्ता अशा विविध कामांचा भूमिपूजन सोहळा येथे आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्या उपस्थित होणार असल्याचे यावेळी बोलताना ज्ञानदेव रांजणे यांनी सांगितले . त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ आणि जलसंपदा खाते असल्याने बोंडारवाडी धरणाचा मार्ग देखील सुकर होणार आहे. बोंडारवाडी धरण संदर्भात मागील आठवड्यात मंत्रालयात मिटींग झाले बरोबर सर्वे साठी ८० लाखाचा निधी उपलब्ध होणार असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी केळघरच्या सरपंच सौ सविता बेलोशे, उपसरपंच सागर पार्टे, सचिन बिरामणे,आनंदा भिलारे,शंकर बेलोशे,काशिनाथ बेलोशे,बाळासाहेब शिर्के,संदिप बेलोशे यांचेसह आसणी व केळघर येथील ग्रामस्थ उपस्थित होते .



