सामाजिक

चालकांच्या निर्व्यसनी निरोगी जीवनामुळे प्रवाशाचे जीवन आल्हाददायक

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी …….

सातारा.दि.२६. डॉ. ऋतुजा गायकवाड. सातारा दि. प्रतिनिधी राज्याबरोबर देशात अपघाताच्या घडणार्‍या घटनेत जास्त खाजगी व्यसनाधीन चालकांच्यामुळे झाल्या असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकांनी आपले शारीरिक व मानसिक तणाव सांभाळून आदर्श असे काम केल्याने परिवहन प्रशासनाच्या धाकाने वाहन चालकांच्या निर्व्यसनी वृत्तीतून सर्वसामान्य प्रवाशांचा होणारा प्रवास हा आल्हाददायक असून आज ही पुणे मुंबईला व दूरवर जाणारे उच्चलोक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करीत असल्याचे प्रतिपादन डॉ. गायकवाड यांनी केले.

सातारा परिवहन अधिकारी यांच्या व डॉ. प्रताप गोळे यांच्या प्रतिभा हॉस्पिटल सातारा यांच्या संकल्पनेतून मेढा आगारात आयोजित करण्यात आलेल्या परिवहन कर्मचारी यांच्या आरोग्य तपासणी शिबीर प्रसंगी पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की मेढ़ा आगारातील सर्व कर्मचारी हे ग्रामीण भागातील असून त्यांच्या आरोग्य विश्वात तंदुरुस्ती बाबत सूक्ष्म निरीक्षण केले असता त्यांनी राखलेल्या शारीरिक तंदुरुस्ती ही शहरी भागातील चालकांच्या तुलनेत तंदुरुस्त असून व्यायाम व निर्व्यसनी राहून चालकांसह वाहक यांनी आपली शारीरिक क्षमता वाढविण्याचे आवाहन केले.

मेढा परिवहन आगारातील 95 कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली यावेळी मेढा आगार प्रमुख श्रीमती पवार बाबर आपले मनोगत व्यक्त करते वेळी म्हणाल्या की मेढा आगारातील शिस्तबद्ध कर्मचार्‍यांना सोबत घेऊन जेष्ठ असो अगर श्रेष्ठ त्यांच्याच प्रयत्नातून सर्व विद्यार्थ्यांन पासून जेष्ठ नागरिक व महिलांसाठी आदर दाखवून सर्व कर्मचारी लिनता व कृतघ्नता दाखवितात त्यामुळे सामाजिक सहकार्यामुळेच महाराष्ट्र राज्यात स्वच्छता अभियान सर्वेक्षणात प्रथम येण्यासाठी जावली तालुक्यासह सातारा येथील सर्व अधिकारी व मार्गदर्शक यांचे सहकार्य लाभले असून आपल्या आगाराला अंतिम फेरीतील बक्षीस मिळण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेसह पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिकांच सहकार्याने लाभत आहे. आमच्या आगारातील सर्व कर्मचारी हे व्यसन निर्मूलनासाठी कायम धडपडताना दिसतात व स्वच्छते बाबत कायम अग्रेसर असल्याचा अभिमान असल्याचे नमूद केले.

प्रारंभी डॉ. ऋतुजा गायकवाड मेढा आगाराच्या मानसेवी वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वरोगनिदान शिबिरातील सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली यावेळी डॉ. अंशुमन गायकवाड डॉ. निखील ठाकरे, डॉ. शिवाअंजली भोईटे. रविराज जाधव यांचे सहकार्य लाभले. सर्व मेढा आगारातील तांत्रिक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!