छत्रपती शिवाजी महाराजसातारा

आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाच चिमुकल्यांच्या आवाजाने केळघर परिसरात दणदणाट

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——– युवराज धुमाळ

केळघर. दि.३१.जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्य़ासाठी आज आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा,अरे कोणी आरक्षण देत कारे आरक्षण अशी जोरदार घोषणाबाजी करत केळघर बाजारपेठ व परिसरात चिमुकल्यांच्यासह ग्रामस्थांच्या आवाजाने संपूर्ण परिसरात आज दणाणून गेला.


मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करिता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यभर साखळी उपोषणे,राजकीय नेत्यांना गावबंदी तसेच प्रबोधन प्रचार इत्यादी कार्यक्रम सुरू आहेत काल सोमवारी मेढा येथे सकल मराठा समाज जावली तालुका यांच्या वतीने मराठा समाजाला त्वरीत आरक्षण मिळावे यासाठी मेढा शहरातून दुचाकी रॅली काढून जावलीचे तालुक्याचे तहसिलदार हणमंत कोळेकर व सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांना आपली विनंती प्रशासना पर्यंत पोहचिण्यासाठी सकल मराठा समाज जावली यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.


आज सकल मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवावा यासाठी दिलेल्या हाकेसाठी केळघर येथील ग्रामस्थांनी मराठा समाजाला त्वरीत आरक्षण मिळावे व प्रशासनाने यावर लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा यासाठी केळघर बाजारपेठ कडकडीत बंद पाळून शांततेत बाजारपेठेतून व परिसरातून गावातील लहान लहान चिमुकल्यांसह ग्रामस्थ महिलांसह घोषणा देत सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली. मेढा येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणालाही ग्रामस्थांचा जाहीर पाठिंबा असल्याचे ही यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.


यावेळी केळघरचे मा.सरपंच सुनिल जांभळे, उपसरपंच सागर पार्टे मा.उपसरपंच सचिन बिरामणे, सकल मराठा समाज जावली तालुका संयोजक दत्ता बेलोशे,सदस्य काशिनाथ बेलोशे, ह.भ.प. संजय बेलोशे (नाना), मा.सरपंच राजेंद्र गहिने, बोंडारवाडी धरण कृती समितीचे सदस्य श्रीरंग बैलकर, युवा नेते संतोष कासुर्डे, युवा नेते संदिप बेलोशे,युवा उद्योजक संदिप कासुर्डे,युवा नेते अंकुश बेलोशे,जगन्नाथ पार्टे, आनंदा भिलारे, युवा नेते सतिश पार्टे,शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब शिर्के,ज्येष्ठ नागरिक पांडुरंग बेलोशे,ज्येष्ठ नागरिक श्रीरंग मोरे,मनोहर शिर्के, यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ,महिला उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!