महाराष्ट्रशैक्षणिकसातारा

कोरोनाच्या निर्बंधांसहित मेढ्यात बारावीची बैठक व्यवस्था….

स्टार ११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

मेढा. दि.०३ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांना येत्या ०४ मार्च पासून सुरुवात होत आहे. याबाबत मेढ्यातील महाविद्यालयांकडून बैठक व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.

मार्च २०२२ मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षा ह्या येत्या ०४ मार्च पासून सुरू होणार आहेत. या परिक्षेची बैठक व्यवस्था जाहीर झाली असून परिक्षचे मुख्य केंद्र असणाऱ्या आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात मेढा व कला वाणिज्य व सायन्स ज्युनियर कॉलेज मेढा – जवळवाडी यांची बैठक व्यवस्था मुख्य केंद्रावर करण्यात आली आहे. तर इतर कॉलेजांची बैठक व्यवस्था त्या – त्या उपकेंद्रांवर करण्यात आली आहे. श्री. वेण्णा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज मेढा, दीपक पवार कॉलेज ऑफ सायन्स कुडाळ, लोकनेते मारुतराव पवार कॉलेज ऑफ सायन्स सायगाव, न्यू वेण्णा इंग्लिश मिडीयम स्कुल ऑफ ज्युनियर कॉलेज, मोहाट या उपकेंद्रांवर त्या – त्या कॉलेजांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना चाळीस मिनटे आगोदर प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच पेपर सोडवण्यासाठी अर्धा तास जादा वेळ मिळणार आहे. अशी माहिती एच.एस.सी परीक्षा केंद्र संचालक प्रा. संतोष कदम यांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी थर्मल गनने तपासणी करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी येताना छोटी सॅनिटायझरची बॉटल आणणे मास्क वापरणे तसेच स्वतःची पाण्याची बॉटल आणणे बंधनकारक असल्याचे प्राचार्य. डॉ. प्रमोद घाटगे यांनी सांगितले. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी उपकेंद्र प्रमुख प्रा. पाटील एस एन .हे काम पहात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!