महाराष्ट्रसामाजिक

ग्रामविकासात महिला पुढे आल्यास गावांचा कायापालट होतो      डाॅ.निलमताई गोरे


स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——

वर्षाताई जवळ यांचा स्त्री सन्मान पुरस्काराने गौरव

    मेढा. दि.१४.चुल आणि या पलिकडे जावून आज सर्वच क्षेत्रात महिलांनी घेतलेली आघाडी आदर्शवत असून  समाजासाठी योगदानग देणार्‍या व कौतुकास्पद,उल्लेखनिय कार्य करणार्‍या महिलांचा सन्मान शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने केला जात असून ग्रामिण भागात उल्लेखनिय कार्य करणार्‍या महिला या समाजासमोर आयडाॅल असून ग्रामविकासात महिला पुढे आल्या तर गावचा विकास होतो असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उप- सभापती डाॅ.निलमताई गोरे यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात केले.

विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ.निलमताई गोरे  व शिवसेना उपनेत्या मा.शितल म्हात्रे,यांच्या हस्ते वर्षाताई जवळ यांना पुरस्कार देण्यात करण्यात आला.


     छ.संभाजीनगर शहरातील तापडीया नाट्यगृहात शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने ।।यत्र नार्यस्तु पूज्यन्ते।। स्त्री सन्मान पुरस्कार २०२४ आयोजीत  करण्यात आला होता. या पुरस्कारासाठी ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या सातारा जिल्ह्यातील जवळवाडी ग्रामपंचायतीच्या मा. सरपंच सौ.वर्षाताई जवळ यांची निवड करण्यात आली होती.


धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यावेळी बोलताना म्हणाले ५०० हून अधिक नामांकनामधून आम्ही काही निवडक आदर्शवत, उल्लेखनिय कार्य करणार्‍या महिलांची निवड केली असून विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ.निलमताई गोरे यांच्या शुभहस्ते व शिवसेना उपनेत्या मा.शितल म्हात्रे, मा.चंद्रकांत राठी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत आहे याचा आनंद आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ.निलमताई गोरे यांचे शुभहस्ते सन्मानचिन्ह व पैठणी देवून “स्त्री सन्मान पुरस्कार” देवून महिलांचा गौरव करण्यात आला.


यावेळी वर्षाताई जवळ म्हणाल्या हा पुरस्कार माझ्या ग्रामस्थांना व महिलांना समर्पित करते. ग्रामस्थांनी दिलेल्या संधीमुळेच व महिला व युवकांच्या सहभागामुळेच एवढ्या दूर जवळवाडीकरांनी केलेल्या कार्याचा गौरव होत आहे. याचा मनस्वी आनंद आहे. डाॅ.निलमताई गोरे यांनी पाठिवर टाकलेली कौतुकाची थाप व दिलेला कानमंत्र आयुष्यभर प्रेरणा देत राहील.

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!