करंजे तर्फ मेढा येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ
मेढा.दि.०८ जावली तालुक्यातील करंजे तर्फ मेढा येथे जागतिक महिला दिनानिमित्त सौ.वेदांतिकाराजे भोसले महिला मंडळ करंजे यांच्यावतीने महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
खडतर परिश्रम आणि अटळ आत्मविश्वासाच्या बळावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून विविध क्षेत्रात छाप टाकणाऱ्या करंजे गावच्या कर्तृत्ववान महिला व मुली यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम ,फनी गेम,महिला आरोग्याविषयी मार्गदर्शन,महिला सबलीकरण मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले होते,या कार्यक्रमाच्या निमत्ताने समस्त महिला भगिनींनी मोठया आनंदात करंजे येथे जागतिक महिलादिन साजरा केला.
या कार्यक्रमासाठी जि.प.सदस्य सौ.अर्चनाताई रांजणे सौ,संकपाळ मॅडम (केंद्रप्रमुख) व सामाजिक कार्यकर्त्या सौ,जयश्री शेलार,सरपंच सौ.स्वप्नाली धनावडे, उपसरपंच सौ. संजना चिकणे, सदस्य सौ शितल धनावडे,सदस्य सौ ज्योती निकम सदस्य सौ.जयश्री धनावडे,सविता विभूते,सुषमा धनावडे,संगीता धनावडे,लता धनावडे,दर्शना धनावडे,अदिती धनावडे,गौरी धनावडे, निता धनावडे, विद्या धनावडे, निशा धनावडे,जयलक्ष्मी धनावडे उपस्थित होत्या.
तसेच या कार्यक्रमाचे आयोजन शाम धनावडे (बाबा),हणमंतराव धनावडे,काशिनाथ धनावडे,अरुण गोळे ,डॉ,संजय धनावडे,विकास धनावडे,सुभाष धनावडे, विठ्ठल धनावडे, यांनी केले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ,शिंगटे मॅडमयांनी केले व सौ.आशा धनावडे अध्यक्ष वेदांतिकाराजे भोसले महिला मंडळ करंजे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.



