जितेंद्र दगडूदादा सकपाळ यांची ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी निवड

स्टार ११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ
मुंबई दि.११ शिवसेना प्रणित शिव सामर्थ्य सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस जितेंद्र दगडूदादा सकपाळ यांची ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जितेंद्र सकपाळ हे ‘द आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत’ संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष देखील आहेत.ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनाश धनंजय सकुंडे, चेतना अविनाश सकुंडे, राष्ट्रीय महासचिव डॉ. आशिष कुमार मोहन्ती यांच्या आदेशानुसार जितेंद्र दगडूदादा सकपाळ यांची निवड करण्यात आली. ते शिवसेना प्रणित शिव सामर्थ्य सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस, आशेरमुख फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय पत्रकार संसद फोरमच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत.त्यांच्या या निवडीबद्दल शिवसेनेतील विविध मान्यवरांकडून त्यांचे अभिंनंदन करण्यात आले.
Δ



