महाराष्ट्रसातारासामाजिक

डी युनिटी चषकाचा सह्याद्रीनगर येथे शुभारंभ… डोंगर माथ्यावरील पहिल्या भव्य स्पर्धेचे आयोजन….

कास. दि. १८. सह्याद्रीनगर येथील तरूण मंडळाच्या माध्यमातून प्रथमच दुर्गम डोंगर माथ्यावरील क्रिडापट्टूंसाठी डी युनिटी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शिक्षक भारती संघटनेचे नेते सुर्यकांत पवार, गांजे विकास सोसायटी चे संचालक तुकाराम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मारूती शिंदे, बापूराव गोरे, विलास शिंदे, कृष्णा शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.                  यावेळी उद्घाटनपर भाषणात सुर्यकांत पवार म्हणाले, सह्याद्री नगर गाव पर्यटन दृष्ट्या विकसित होत असून येथील तरूणांनी क्रिडा स्पर्धेच्या माध्यमातून डोंगर माथ्यावरील खेळाडूंच्या कौशल्याला वाव दिला आहे. यातूनच काही खेळाडू भविष्यात चांगल्या स्पर्धेत खेळताना दिसतील. या स्पर्धेसाठी माजी शिक्षण सभापती अमितदादा कदम यांनी प्रथम, रासपचे उपाध्यक्ष राजू कोकरे यांनी द्वितीय, कै. रामभाऊ शिंदे यांच्या स्मरणार्थ कृष्णा शिंदे यांनी तृतीय, रासपचे प्रकाश खरात यांनी चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस दिले आहे. नंदकुमार गोरे, राजेश शिंदे, जगन्नाथ शिंदे, विलास शिंदे, कृष्णा शिंदे यांनी आकर्षक चषक देऊन स्पर्धेच्या संयोजनात वाटा उचलला आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विलास शिंदे,कृष्णकांत शिंदे,सचिन गोरे,सूरज गोरे,संतोष ढेबे,दिपक ढेबे,सौरभ शिंदे,मयुरेश हिरवे,ऋषिकेश शिंदे,सचिन झोरे,कृष्णा शिंदे,ऋषिकेश हिरवे आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!