
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज / कोळघर प्रतिनिधी
तेटली.दि.२२.तेटली ता.जावली या ठिकाणी शिवजयंती उत्सव समिती तेटली यांचे वतीने तिथीप्रमाणे साजरी होणारी शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली हे त्यांचे १३ वे वर्ष असून बामणोली, तापोळा,कोयना, सोळशी ,कांदाटी या १०५ गावच्या कोयना विभागात तिथीप्रमाणे येणारी ही शिवजयंती फक्त तेटली या गावात साजरी केली जाते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याची पालखीतून संपूर्ण गावातून हलगी, ढोल, ताशा अशा वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.तर बाळसिद्धेश्वर मंदिरानजीक उभारण्यात आलेल्या महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्प हार अर्पण करून घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ या घोषणा देण्यात आल्या. या मिरवणुकीमध्ये शाळेतील मुले ,गावातील ग्रामस्थ, महिला तरुण वर्ग बहुसंख्येने सामील झाले होते मिरवणुकीनंतर शिवाजी चौकामध्ये शिवचरित्र पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी नितीन मोहिते यांनी शिवचरित्रावर आधारित व्याख्यान सांगितले त्यानंतर मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त केली.
यावेळी माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, जि.प.चे माजी अर्थ व शिक्षण समिती सभापती अमित कदम, शिवजयंती समितीचे अध्यक्ष शिवाजी भोसले,सरपंच रामचंद्र भोसले, गणेश उतेकर, विशाल सपकाळ, विठ्ठल धनावडे, राम शिंदे,विजय शिंदे,सेवानिवृत्त फौजि संतोष चव्हाण, एकनाथ ओंबळे,विश्वनाथ धनावडे,तानाजी आगुंडे,अरुण निपाणे उपस्थित होते. यावेळी तेटली व केळघर तर्फ सोळशी येथील व भागातील ग्रामस्थ, महिला, सरपंच, पोलिस पाटील बहुसंख्येने उपस्थित होते.



