सातारासामाजिक

जवळवाडी महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम.
– आनंदाशेठ सावंत

“दर्शनवारी”सांगलीतील आदरातिथ्याने महिला गहिवरल्या

स्टार ११ महाराष्ट्र

मेढा.दि.१३. जवळवाडी ता.जावळी येथिल महिला मंडळाचे वतीने दरवर्षी “दर्शनवारी” या उपक्रमाचे आयोजन केले जाते. घर, प्रपंच,शेती मध्ये श्रमणार्‍या महिला भगिनींना थोडासा विरंगुळा मिळावा या उदात्त हेतूने हा उपक्रम गेली ३ वर्षे सातत्याने सुरू असून देवदर्शना बरोबरच काही आदर्शवत असणारी गावे आणि त्याठिकाणी राबविले जाणारे अनेक प्रेरणादायी उपक्रम अनुभविण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे गौरवोदगार जावळी तालुक्यातील सांगलीस्थित उद्योजक आनंदाशेठ सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले.


जवळवाडी येथिल महिला मंडळ दरवर्षी विविध ठिकाणी दर्शनवारीचे आयोजन करीत असून यापूर्वी पंढरपूर,आळंदी, देहू, असे आयोजन करण्यात आले होते.या वर्षी ही दर्शनवारी जोतिबा, महालक्ष्मी,कण्हेरीमठ व नृसिंहवाडी असा प्रवास करीत यशस्वी झाली. श्री जोतिबा मंदिरामध्ये महिलांनी झिम्मांचा डाव धरला. या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या शहरी भागातील महिला भाविक यामध्ये आनंदात सहभागी झाल्या.


महालक्ष्मी दर्शनानंतर दुपारी २ वाजता छोटीशी भुक भागविण्यासाठी चिवड्याची पुड्या उघडल्या गेल्या यावेळी महिला म्हणाल्या आली आली “जवळवाडीची दर्शनवारी”, कोल्हापूरच्या महालक्ष्मी दरबारी,सोबतीला खमंग,कुरकुरीत लज्जतदार भारी “महालक्ष्मी रिटकवली” चिवड्याची चवच न्यारी यानंत गाड्या पोहचल्या सिध्दगिरीवर. कण्हेरी मठातील गार्डन व म्युजियम पहावून महिला अत्यंत हर्ष उल्हाशित झाल्या. नृसिंहवाडीच्या घाटावर श्रीदत्त दिगंबरांचे दर्शन घेवून गाड्या रात्री ९ वाजता सांगली येथे पोहचल्या.


सांगली येथिल हाॅटेल उद्योजक मा.आनंदाशेठ सावंत यांनी दर्शनवारीमध्ये आपल्या जन्मभूमीतून आलेल्या सर्व महिलांचे स्वागत केले.श्री गणेश व्हेज थाळीतील मेजवाणी पहावूनच महिलांनी जेवणाअगोदरच आनंदाचा तृप्तीचा ढेकर देत सावंत यांना मनोमन धन्यवाद दिले.


मा.आनंदाशेठ सावंत महिलां समोर बोलताना यावेळी म्हणाले घर-प्रपंचाचा गाढा हाकताना श्रमणार्‍या माता-भगिनींना दर्शनवारीच्या माध्यमातून एक दिवस का होईना देवदर्शना बरोबरच पर्यटनाचा आनंद मिळतो त्यामुळे जवळवाडी महिला मंडळाचा हा उपक्रम स्तुत्य असून अनुकरणिय आहे.


दर्शवारीच्या वतीने शिवशंभो ग्रामसंघाच्या प्रेरिका राजश्री पाटील यावेळी बोलताना म्हणाल्या शुन्यामधुनी उद्योगाचे विश्व निर्मिले ध्येयाने,नमन करितो आपल्या कर्तुत्वाला सन्मानाने अशा शब्दात व्यक्त होत सावंत यांचा सत्कार करण्यात आला.वैशाली जवळ,मनिषा शेडगे यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!