सातारासामाजिक

श्री संत तुकोबाराय मंदिर कार्यात कायम सोबत  श्री ज्ञानदेवजी रांजणे

स्टार ११ महाराष्ट्र

जावळी तालुका वारकरी संघ तथा जगदगुरू श्री तुकोबाराय चॅरिटेबल ट्रस्ट जावळी यांचेवतीने मोहाट ता.जावळी येथिल ११ एकर जागेवर श्री संत तुकोबाराय मंदिर प्रकल्प निर्माण कार्य सुरू केले जात असून महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे माध्यमातून पूर्ण सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक श्री ज्ञानदेव रांजणे यांनी मोहाट येथे वारकर्‍यांंच्या भेटी प्रसंगी केले.


ज्ञानदेवे रचिला पाया।तुका झालासे कळस।। या उक्ती प्रमाणे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांची मुळभूमी असलेल्या व आठवे पूर्वज श्री विश्वंभरबाबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या जावळी तालुक्यात श्री संत तुकोबाराय मंदिर निर्माण कार्य हाती घेण्यात आले असून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला अभिमान वाटेल अशा ख्यातीचे भव्य मंदिर व त्याच बरोबर अनेक लोकोपयोगी प्रकल्प निर्माण करण्याचे कार्य होणार असून सर्वांनी तन,मन,धन अर्पण करून या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळकृष्ण महाराज शिंदे यांनी सांगितले. या प्रकल्पाकडे जाणारा रस्ता,पाणी आणि वीज व्यवस्था गरजेची असून पुढील ३ महिन्यात या व्यवस्था व्हायला पाहिजेत अशी भूमिका श्री ज्ञानदेव रांजणे यांचे समोर मांडली.


ज्ञानदेव रांजणे म्हणाले मेढा येथे पारायण सोहळ्यामध्ये जाहीर केल्याप्रमाणे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे माध्यमातून आम्ही सर्वोतोपरी या प्रकल्पाला सहकार्य करणार असुन संत श्री तुकोबाराय मंदिर प्रकल्पामुळे पर्यटनासाठी जावळी तालुक्याकडे आलेले पर्यटक भक्ती आणि शक्तीचे प्रतिक असणार्‍या या प्रकल्पामुळे आध्यात्माच्या वाटेवर यास्थळी येवून लीन होतील. त्यामुळे राजकीय, सामाजिक,आध्यात्मिक अशा सर्वच स्तरातून या प्रकल्पाला सहकार्य नक्की होईल.त्यामध्ये आम्हीही जी जबाबदारी द्याल ती पार पाडण्यासाठी कटीबद्द असल्याचे सांगितले.


यावेळी उद्योजक एस.एस.पार्टे गुरूजी,ट्रस्टचे उपाध्यक्ष मोहनबापू वारागडे,सचिव विलासबाबा जवळ,प्रविण महाराज शेलार,सुभाष महाराज मिस्त्री,विलास पवार, तुकारामबुवा जवळ,सरपंच विलास धनावडे,विष्णूपंत धनावडे,विष्णू धोंडीबा धनावडे,रामचंद्र धनावडे, अंकुश धनावडे इ. ग्रामस्थ,वारकरी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!