राजकीयसातारा

आंबेघर तर्फ मेढा गणातुन नारायण जाधव (भाऊ) यांना उमेदवारी मिळावी . .

स्टार ११ महाराष्ट्र


मेढा.दि.१४.  जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून जावली तालुक्यातील आंबेघर तर्फ मेढा गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओ.बी.सी.पुरुष आरक्षित झाला आहे.

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विश्वासू,जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांचे कट्टर समर्थक म्हणुन तालुक्यात ओळख असलेल्या नारायण जाधव यांना पंचायत समिती आंबेघर तर्फ मेढा गणातुन उमेदवारी मिळावी अशी मागणी त्यांच्या मित्र समुहाच्या व विभागातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.


नारायण जाधव यांचे या गणातील प्रत्येक गावात जिव्हाळ्याचे संबंध असुन प्रत्येक गावातील नागरिकांसोबत अतिशय चांगला संवाद असुन ते गेले २० वर्षे फोटोग्राफीच्या माध्यमातुन नागरिकांशी चांगले संबंध आहेत.


याबरोबरच त्यांनी केळघर विकास सेवा सोयायटीत व्हा . चेअरमन म्हणुन सुद्धा काम केले आहे.ते नेहमीच या पंचक्रोशीतील राजकीय ‘ सामाजिक , सांस्कृतीक, धार्मिक, शैक्षणीक क्षेत्राबरोबरच प्रत्येकाच्या सुख दुःखात कार्यरत असतात व पत्रकारीतेच्या माध्यमातुन त्यांची एक वेगळी ओळख आहे .त्याबरोबरच त्यांना समाजकार्याची आवड असल्याने आंबेघर गणातील नागरीकांकडून त्यांच्यासाठी उमेदवारीची मागणी होत आहे .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!