केळघर विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी श्री रामचंद्र शेलार व व्हा.चेअरमनपदी श्री संपत सुर्वे यांची निवड
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
केळघर. दि.२३.जावळी तालुक्यातील केळघर विभागातील १५ गावचे कार्यक्षेत्र असलेल्या केळघर विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी श्री रामचंद्र दगडु शेलार यांची तर व्हा चेअरमनपदी श्री संपत पांडुरंग सुर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
केळघर विकास सेवा सोसायटीची संचालक मंडळाची निवडणुक आ शिवहरसिंहराजे भोसले व सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे संचालक श्री ज्ञानदेव रांजणे यांचे नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली होती तर आज केळघर ता जावली येथील संस्थेच्या कार्यालयात चेअरमन ,व्हा चेअरमन निवडीसाठी अध्यासी अधिकारी श्री सुभाष पवार यांचे अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी चेअरमन पदासाठी श्री रामचंद्र शेलार व व्हा .चेअरमन पदासाठी श्री संपत सुर्वे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या निवडी बिनविरोध झाल्याचे अध्यासी अधिकारी श्री पवार यांनी घोषित केले .
यावेळी केळघर विकास सेवा सोसायटी चे संचालक श्री ज्ञानदेव रांजणे, मारुती श्रीपती पार्टे, जगनाथ मारुती शेलार, सुनिल श्रीपती जांभळे, तुकाराम गणपत पार्टे, नारायण शिवराम जाधव, दिलिप विष्णु पाटील, शिवाजी श्रीरंग चव्हाण, सौ पार्वती शंकर बेलोशे, सौ.संजना प्रकाश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती .
नवनिर्वाचित चेअरमन रामचंद्र शेलार व व्हा.चेअरमन संपत सुर्वे व संचालकांचे आ शिवेंद्रसिंहराजे भोसले,जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे संचालक श्री ज्ञानदेव रांजणे, सहाय्यक निबंधक श्री नानासाहेब रुपनवर विकास अधिकारी दुर्गावळे यांचेसह परिसरातुन अभिनंदन होत आहे . कार्यक्रमात उपस्थितांचे आभार संपत सुर्वे यांनी मानले.



