सातारासामाजिक

जगदगुरू श्री तुकोबाराय चॅरिटेबल जावळी यांचे वतीने भक्ती-शक्ती गडावर उभारला वारकरी ध्वज

स्टार ११ महाराष्ट्र

संत तुकोबांच्या नामघोषाने दुमदुमला भक्ती-शक्ती गड
जगदगुरू श्री तुकोबाराय चॅरिटेबल ट्रस्टने उभारीला वारकरी ध्वज

    मोहाट ता.जावळी येथिल भक्ती-शक्ती गडावर जगदगुरू श्री तुकोबाराय चॅरिटेबल जावळी यांचे वतीने ११ एकर जागेवर संत श्री तुकोबाराय मंदिर निर्माण कार्य.श्री  विश्वंभरबाबा आध्यात्मिक केंद्र उभारण्याचे कार्य हाती. जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा जयंती दिन या दिवसाचे निमित्ताने ध्वज उभारून केला.

नामजपाचा जयघोष जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे आठवे पूर्वज श्री विश्वंभरबाबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या जावळी तालुक्यातील क्षेत्र मोहाट येथे लवकरच भव्य मंदिर कार्याचा भूमीपूजन सोहळा लवकरच संपन्न होणार असून देणगीदार, हितचिंतक,वारकरी-भाविक यांच्या सहकार्यातून हा प्रकल्प लवकरच उभा रहाणार असून महाराष्ट्राला आदर्शवत असेल असेच श्री संत तुकाराम महाराजांचे मंदिर येथे उभे रहाणार असून या शक्तीस्थळावर संत तुकोबांच्या जयंतीच्या निमित्ताने  वारकरी ध्वज उभा करून या ठिकाणी नामजपाचा जयघोष करण्यात आला.

संत तुकोबांची गाथा पाण्यात बुडाली नाही उलट त्याला बांधलेल्या दगडांनाही तारण्याचे काम संत तुकोबांनी दिलेल्या विचारांनी केले आहे.त्याच तुकोबांची महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मंदिरे उभी रहायली आहेत.आता आपल्याला जावळी तालुक्यातील मोहाट येथे असेच भव्य मंदिर उभे करायचे असून सर्वांनी या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्टचे विश्वस्त ह.भ.प.धोंडीराम महाराज संकपाळ व ह.भ.प. विजय महाराज शेलार यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाला विलासबाबा जवळ, शांताराम कदम,सरपंच विलास धनावडे,अरूण जवळ,रामचंद्र शेलार,सतिष सणस,विवेक सरडे व वारकरी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!