राजकीय
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंती निमित्त वृक्षारोपण करून जन्मशताब्दी साजरी
स्टार ११ महाराष्ट्र
सातारा.दि.२५. हिंदुहृदयसम्राट वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंती निमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांची पहिली शाळा धननीची बाग येथील निवासी शाळेत १०० किलो गहू १००किलो तांदूळ आणि मिष्ठान्न भोजन आणि शाळेच्या बगीच्यात फुलझाडांचे वृक्षारोपण करून जन्मशताब्दी साजरी करण्यात आली.
यावेळी प्रशांत गुजरेसर,शिवसेना सातारा शहरप्रमुख प्रणव सावंत आणि तालुकाप्रमुख रमेशआण्णा बोराटे यांनी मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा संघटक रविराज बडदरे, जिल्हा चिटणीस शैलेश बोडके, गणेश अहिवळे, विजय धुमाळ, बाळासाहेब धुमाळ, समीर धुमाळ, रोहित जाधव, सुमित नाईक, अशितोष पारंगे,अथर्व पवार, पार्थ दाते, महेंद्र पाटील,गणेश जाधव, राहुल साळुंखे, संतोष जाधव आणि शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.



