वरोशी येथील काळेश्वरी यात्रा उत्सवाच्या कार्यक्रमात बदल;
शासकीय अडचणींमुळे काळेश्वरी यात्रा उत्सवाच्या कार्यक्रमात बदल; भाविकांनी नोंद घ्यावी

स्टार ११ महाराष्ट्र ——
शासकीय अडचणींमुळे काळेश्वरी यात्रा उत्सवाच्या कार्यक्रमात बदल
केळघर.दि.०१. काळेश्वरी देवीचा वार्षिक यात्रा उत्सव २०२६ हा नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत वरोशी व समस्त ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या भक्तिभावात आयोजित करण्यात आला आहे. मात्र काही शासकीय अडचणींमुळे यंदा उत्सवाच्या कार्यक्रमात एक दिवसाचा बदल करण्यात आला असल्याची माहिती सरपंच विलास शिर्के यांच्या वतीने देण्यात आली आहे.

यानुसार, गुरुवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता महाअभिषेक, तर संध्याकाळी ७ वाजता जागरण व गोंधळाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यानंतर शुक्रवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी मुख्य यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
काळेश्वरी देवीच्या दर्शनासाठी परिसरासह दूरदूरच्या गावांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. त्यामुळे कार्यक्रमातील या बदलाची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी व नियोजनानुसार उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच,ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.



