राजकीय

नागठाणे येथील शेतकरी चक्काजाम आंदोलनास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा जाहीर पाठिंबा

स्टार ११ महाराष्ट्र

बळीराजाच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी!

सातारा : नागठाणे, सातारा येथे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ऊसाला रास्त भाव मिळावा या मागणीसाठी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.


पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशाने आणि संपर्कप्रमुख मा. श्री. उदयजी दळवी साहेब यांच्या सूचनेनुसार हा पाठिंबा जाहीर करण्यात आला.
आज रस्त्यावर उतरलेला हा शेतकरी कुणी गुन्हेगार नाही. हा तोच बळीराजा आहे, ज्याने वर्षभर उन्हातान्हात राबून, कर्ज काढून, स्वतःच्या लेकरांचे पोट मारून ऊस पिकवला. आणि आज त्याच्याच घामाचा पैसा नाकारला जातोय, यापेक्षा मोठी शोकांतिका कुठली?


शेतकऱ्याला भीक नको, त्याला त्याच्या घामाचा हक्काचा दाम पाहिजे! ऊसाला रास्त भाव मिळालाच पाहिजे, हा हट्ट नाही, हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेला हा लढा केवळ ऊसदराचा नाही, तर हा शेतकऱ्याच्या स्वाभिमानाचा लढा आहे. आणि या लढ्यात शिवसेना शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून उभी राहील, हे आमचे वचन आहे.
सरकारने आणि कारखानदारांनी आता तरी डोळे उघडावेत. बळीराजाच्या संयमाचा अंत पाहू नये. शेतकरी रडला तर महाराष्ट्र रडेल!


या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. राजेंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात श्री. प्रणव सावंत, शिवसेना सातारा शहरप्रमुख, श्री.निमिष शहा शिवा आरोग्य सेना सातारा जिल्हा समन्वयक,श्री. सागर धोत्रे, युवासेना उपजिल्हाधिकारी, श्री. रविराज बडदरे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हासंघटक, तालुकाप्रमुख श्री. अनिल गुजर, श्री. सुनील पवार, श्री. शैलेश बोडके, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हासंघटक, श्री. गणेश अहिवळे, श्री. रविंद्र शेळके (मेजर), श्री. ॲड. शिवेंद्र ताटे, श्री. सुमित नाईक, श्री. अक्षय भोसले, श्री. शुभम जाधव आणि शिवसैनिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी जगला तरच महाराष्ट्र जगेल!

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!