राजकीय

महाराष्ट्र एसटी कामगार सेना कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध

सातारा, दि.०४. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष तथा खासदार अरविंद सावंत साहेब यांच्या आदेशान्वये, सरचिटणीस  हिरेनजी रेडकर साहेब व कार्याध्यक्ष प्रदीप धुरंदर साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचा सातारा विभागाचा दौरा संपन्न झाला.

या दौऱ्यामध्ये शिवसेना सातारा शहरप्रमुख तथा महाराष्ट्र एसटी कामगार सेना सातारा जिल्हाध्यक्ष  प्रणव सावंत, सातारा वाहतूक सेना जिल्हा सचिव ज्ञानदेव भोसले, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा उपसंघटक शैलेश बोडके, जिल्हा संघटिका संगीता जाधव (कराड-पाटण), श्रीमती सलमा शेख (माण-खटाव) यांच्यासह राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र मोजाड, मुंबई प्रादेशिक सचिव सुरेश आव्हाड, सहप्रादेशिक सचिव श्री. नरेश खेडेकर, श्री. तौसिफ शेख,  पवन फाळके, सुहास जंगम, निखिल वाघमारे आणि कराड आगार सचिव सचिन महाडिक उपस्थित होते.

यावेळी सातारा विभाग नियंत्रक, सातारा आगार व्यवस्थापक आणि यंत्र अभियंता, चालन, सातारा विभाग यांच्याशी एसटी कामगारांच्या विविध अडीअडचणी व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

एसटी कामगार हा केवळ कर्मचारी नसून हजारो कुटुंबांचा आधार आहे. ऊन-पाऊस सहन करून जनतेची सेवा करणाऱ्या कामगारांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलावे, त्यांच्या कुटुंबात सुख नांदावे आणि त्यांच्या न्याय्य हक्कांना योग्य तो न्याय मिळावा, हीच महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची प्रामाणिक भूमिका आहे.

कामगारांचे प्रश्न हेच आमचे प्रश्न आणि कामगारांचे हित हेच आमचे ध्येय! प्रत्येक कामगाराच्या सुख-दुःखात खंबीरपणे सोबत राहून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना सदैव संघर्षशील राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!