Star 11maharashtra
केळघर. वाढदिवस म्हटले की केक कापणे, मित्रमंडळींचा जल्लोष आणि शुभेच्छांचा वर्षाव असे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. मात्र, आपल्या वाढदिवसाचा आनंद समाजातील वंचित घटकांसोबत वाटून घेत त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचा आदर्श श्रीमंत छत्रपती बाबाराजे प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. ज्ञानेश्वर दळवी यांनी घालून दिला आहे.

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निष्ठावंत मावळे तसेच मा. ज्ञानदेव रांजणे साहेब यांचे विश्वासू सहकारी म्हणून परिचित असलेल्या ज्ञानेश्वर दळवी यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत यंदाही सामाजिक उपक्रमातून आनंदोत्सव साजरा केला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या सणानिमित्त केळघर विभागातील मामुर्डी व आसनी तळ येथील आदिवासी समाजबांधवांच्या घरी प्रत्यक्ष भेट देत फराळ आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सणाच्या आनंदापासून समाजातील कोणताही घटक वंचित राहू नये, या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलल्याचे चित्र पाहायला मिळाले.

स्वतःच्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्याची भावना या उपक्रमातून दिसून आली. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्यासोबत सण साजरा करणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि आपुलकीचे नाते जपणे, हीच या उपक्रमाची खरी विशेषता ठरली. केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता सामाजिक ऋण व्यक्त करण्याचा हा प्रयत्न परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

या उपक्रमाला पंचायत समिती जावळीचे उपसभापती श्री. गोरख महाडीक, युवा नेते श्री. सागर धनावडे, भाजपचे मंडल अध्यक्ष श्री. मारुती चिकणे, कृषी उत्पन्न बाजार समिती जावळी-महाबळेश्वरचे संचालक श्री. हनुमंत शिंगटे, शिक्षक आघाडीचे अध्यक्ष श्री. रघुनाथ दळवी, पदवीधर आघाडीचे अध्यक्ष श्री. बळवंत पाडळे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री. प्रदीप शेलार, श्री. सुनील जांभळे, श्री. राहुल दळवी, श्री. अक्षय चिकणे, श्री. रोहित शिंगटे, श्री. विकी दळवी, श्री. राजू शेलार, श्री. राजू खुडे, श्री. सचिन पार्टे, श्री. सचिन बैलकर, श्री. सुमित सपकाळ, श्री. सचिन बिरामणे, श्री. सुनील बेलोशे, श्री. संतोष कासुर्डे, श्री. आकाश भिलारे, श्री. संदेश सापते, श्री. अभिषेक दळवी, श्री. अनिकेत शिंदे, श्री. बाळासाहेब कडव, श्री. सुभाष चिकणे, श्री. अशोक सपकाळ, श्री. चंद्रकांत सपकाळ, श्री. बापू जाधव, श्री. अथर्व गाडगीळ, श्री. सुचित शेलार, श्री. विशाल धनावडे आदींची उपस्थिती होती.
तसेच श्रीमंत छत्रपती बाबाराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यचे उपाध्यक्ष श्री. संदीप शेलार, सचिव श्री. चंद्रकांत वेंदे,श्री. विकास ओंबळे, श्री. बापू पार्टे आणि प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. म्हाते, केळघर, केडंबे, आंबेघर, गांजे, कुसुंबी, निझरे यांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
राजकारण, पद आणि प्रतिष्ठेपलीकडे जाऊन समाजातील माणसांशी जोडलेली नाळ टिकवणे महत्त्वाचे असते. ज्ञानेश्वर दळवी यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करत सामाजिक जाणीवेचा संदेश दिला. स्वतःच्या आनंदात समाजातील गरजू कुटुंबांनाही सहभागी करून घेणाऱ्या या उपक्रमाचे केळघर परिसरातून कौतुक होत आहे.
केक कापण्याऐवजी आदिवासी बांधवांच्या घरात दिवाळीचा गोडवा; मामुर्डी,आसनी तळ, केळघर परिसरात फराळ व मिठाईचे वाटप करून जपली माणुसकीची नाळ



