महाराष्ट्रसातारासामाजिक

करंजे येथील सोसायटीच्या चेअरमनपदी रामचंद्र धनावडे तर व्हा.चेअरमनपदी संपतराव धनावडे यांची बिनविरोध निवड

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क


मेढ.दि.२७.जावली तालुक्यातील करंजे तर्फ मेढा येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी रामचंद्र धनावडे तर व्हा चेअरमनपदी संपतराव धनावडे यांची सर्वानुमते आज  बिनविरोध निवड करण्यात आली.
करंजे विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक बिनविरोध निवडणुक नुकतीच पार पडली.गेली ९० वर्षापासून सोसायटीची निवडणुक बिनविरोध होत असून या गावच्या सोसायटीच्या आदर्शवत कारभाराचा इतर सोसायटींनी घ्यावा असे आवाहन निवडणुक निर्णय अधिकारी श्री.सुभाष पवार यांनी केले.निवडणुक निर्णय अधिकारी सुभाष पवार यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रीया पार पडली.

नवनिर्वाचित संचालक महादेव धनावडे,वसंत धनावडे,मारूती धनावडे,पांडूरंग धनावडे,अजित साखरे, पांडूरंग धनावडे, शर्मिला धनावडे,शांताबाई धनावडे, यांचे अभिनंदन ग्रामस्थ मंडळ व निवडणुक निर्णय अधिकारी यांनी केले.
याप्रसंगी पांडूरंग धनावडे,नामदेव धनावडे, तुकाराम धनावडे, यांनी मनोगते व्यक्त केली व संचालक मडंळास शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर धनावडे यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव संजय धनावडे यानी मानले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!