केळघर दि : १८ जावली तालुक्यातील केळघर येथे
आज दत्तजयंती मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली.आज पहाटे काकड आरती,जन्मोत्सव, करण्यात आला.
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस दत्तजयंती म्हणून साजरा करतात.
श्री दत्तप्रभुची उपासना श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार,श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा तर ‘स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे.सालाबादप्रमाणे प्रमाणे साजरा करण्यात येणारी दत्तजयंती ही गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमी साजरी करण्यात आली नाही त्यामुळे या वर्षी आजच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला. गुरुचरित्राचे पारायण केले जाते. भजन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजन करून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमात जेष्ठ नागरिक उद्योजक मारुती धुमाळ,शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब शिर्के,मनोहर शिर्के, उपसरपंच संदिप बेलोशे,जगन्नाथ पार्टे,संजय बेलोशे बाजीराव बिरामणे,योगेश धुमाळ, हरिष गाडवे,बंडा शिर्के,दत्तात्रय पवार,तसेच ग्रामस्थ व महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता.




