महाराष्ट्रसातारासामाजिक

मेढा बैलबाजारात झाली बैलांच्या खरेदी विक्रीची ४५ लाखांहून अधिक उलाढाल…

स्टार ११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

मेढा.दि.०१. मेढा जनावरे वार्षिक बाजाराचे आयोजन कृषि उत्पन्न बाजार समिती जावली व नगरपंचायत मेढा यांचे संयुक्त विद्यमाने करणेत आले होते . या बाजारामध्ये सुमारे ४० ते ४५ लाखाची उलाढाल झाली असून ६०० जनावरांची आवक झाली होती.

सालाबादप्रमाणे बाजारात जातिवंत जनावरे प्रदर्शन व निवड करणेत आली असून या निवडीमध्ये दादा पिसाळ करंदी यांचा बैल चॕम्पियन ठरला. सर्वात जास्त पावत्या सतिश बेलोशे (केळघर) तर सर्वात जास्त किंमतीचा बैल संतोष बाबर (वेळेकामटी) यांनी विकला असुन त्यांना विनोद दादा पार्टे यांचेकडून ट्राॕफी देण्यात आल्या. जातीवंत जनावरे प्रदर्शनात आदत गटामध्ये प्रथम क्रमांक विलास नवले (शेंदूरजणे), द्वितीय क्रमांक हिंदुराव निकम (करंदी), तृतीय क्रमांक संदिप जवळ (जवळवाडी) , दुसा खोंड गटामध्ये प्रथम क्रमांक काशिनाथ करंजेकर (मेढा) द्वितीय क्रमांक पांडुरंग साळुंखे (गणेशवाडी) तृतिय क्रमांक तानाजी सावंत (लिंब), चौसा खोंड गटात प्रथम व द्वितीय क्रमांक नागेश चव्हाण(वेळेकामटी) , तृतिय क्रमांक गणेश भोसले (बेलमाची) , सहादाती बैल गटामध्ये प्रथम क्रमांक बाळू बाबर (वेळेकामटी), द्वितीय क्रमांक बाळकृष्ण लोटेकर (कुस) तृतिय क्रमांक सुरज घोरपडे (वाई), बडीव/जुळीक गटामध्ये प्रथम क्रमांक दादा पिसाळ (करंदी), द्वितीय क्रमांक सचिन मोहिते (आवर्डे), तृतिय क्रमांक अनिकेत भिलारे (करंजे) याप्रमाणे निवड झाली. निवड समिती मध्ये डाॕ.विजय सावंत , डॉ.अनिल चपने, डाॕ.दिपक माने व डॉ.गिरिश महस्के यांनी काम पाहिले.

याप्रसंगी विनोद दादा पार्टे अध्यक्ष, लक्ष्मी चॕरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांनी जनावरांना व जनावरे मालकांना मोफत पिण्याच्या पाण्याची सोय केलेने त्यांचा सत्कार बाजार समितीचे सभापती राजेंद्र शिंदे यांचे हस्ते करणेत आला. त्याचप्रमाणे संतोष करंजेकर, सचिन करंजेकर यांनी बाजारास केलेल्या सहकार्याबद्द्ल, बाजारात आलेले व्यापारी, शेतकरी, दलाल यांचा देखील सत्कार बाजार समितीचे वतीने करणेत आला. सदर प्रसंगी मेढा नगरपंचायत नगाराध्यक्ष पांडुरंग जवळ ( बापू), कांतीभाई देशमुख , बाजार समितीचे संचालक शांताराम पार्टे, चंद्रकांत इनामदार , बाळकृष्ण ओंबळे, दिलीप परामणे , पत्रकार भास्कर धनावडे , व्यापारी व शेतकरी उपस्थित होते. बाजारास केलेल्या सहकार्याबद्दल सर्व शेतकरी , व्यापारी यांचे बाजार समितीचे सचिव महेश देशमुख यांनी आभार मानले. बाजारातील व्यवस्था राजेंद्र कोकरे व संजय शिंदे यांनी पाहिली.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!