स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ———
म्हाते. दि .२५ . आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या निमित्ताने दि. २३/०७/२०२३ रोजी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव, ता. जि. सातारा, तालुका कृषी अधिकारी जावळी , ग्रामपंचायत म्हाते खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने भरडधान्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी भरडधान्यापासुन विविध मुल्यवर्धीत पदार्थ तयार करण्याची पाककला स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, म्हाते खुर्द येथे घेण्यात आली. महिलांनी या स्पर्धेत उत्स्फुर्तपणे भाग घेऊन ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी व राजगिरा इ. तृणधान्यापासुन बनविलेल्या वेगवेगळया पदार्थांचे सादरीकरण केले. तृणधान्य प्रक्रिया उद्योग याविषयावर डॉ. कल्याण बाबर, विषय विशेषज्ञ (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान) यांनी मार्गदर्शन केले. याठिकाणी राबविलेल्या राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत पौष्टिक तृणधान्य पिक प्रात्यक्षिक नाचणी (फुले कासारी) प्रकल्पांतर्गत शेतीशाळेमध्ये नाचणी पिक किड व रोग व्यवस्थापन याविषयावर डॉ. स्वाती गुर्वे, विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण) यांनी तर नाचणी पिक व्यवस्थापन या विषयावर श्री. संग्राम पाटील, कार्यक्रम सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले.
या स्पर्धेमध्ये नाविन्यपुर्ण ज्वारीची बर्फी, नाचणीचे आईस्क्रीम बनविणाऱ्या श्रीमती. सोनाबाई दळवी यांना प्रथम क्रमांक, वरीचा मेंदुवडा व नाचणी डोसा बनविणाऱ्या सौ. शिल्पा दळवी यांना द्वितीय क्रमांक, ज्वारीचा हलवा बनविणाऱ्या सौ. ज्योती दळवी यांना तृतीय क्रमांक, नाचणी भजी बनविणाऱ्या सौ. लक्ष्मी दळवी यांना चतुर्थ क्रमांक, वरीचे वडे बनविणाऱ्या सौ. शुभांगी दळवी यांना पाचवा क्रमांक मिळविल्याबद्दल विजेत्यांना पारितोषीक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्येच नारीशक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. सुनिशा शहा व उपाध्यक्षा श्रीमती. हेमांगी जोशी यांचेमार्फत सहभागी महिलांना भेट वस्तु देण्यात आल्या. या पाक कला स्पर्धेचे परिक्षण श्री. सागर सकटे, डॉ. स्वाती गुर्वे व डॉ. कल्याण बाबर, विषय विशेषज्ञ यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री. राजाराम दळवी होते. या कार्यक्रमास डॉ. महेश बाबर, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव व श्रीमती. भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमावेळी म्हाते खुर्द येथील वसुंधरा महिला शेतकरी गटातील महिलांनी व इतर ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
यावेळी कृषि सहाय्यक श्री. नितीराज जांभळे,श्री.भानुदास चोरगे, कृषि पर्यवेक्षक श्री. जगदीश धुमाळ, कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव येथील श्री. भुषण यादगीरवार, विषय विशेषज्ञ, श्री. बजरंग कदम उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. स्वाती गुर्वे, विषय विशेषज्ञ यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. सागर सकटे, विषय विशेषज्ञ यांनी केले असल्याची माहिती पत्रकार विकास दळवी यांनी दिली.