स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
सातारा.दि .२०. प्रतिनिधी येथील सदाशिव पेठेतील लकेरी फ्रेम वर्क्स या दुकानात निर्मला मोहन भोसले (वय ६३, सध्या रा. गुजरात, मूळ रा. अंगापूर वंदन, ता. सातारा) या फोटो पाहत उभ्या होत्या.
यावेळी तीन अज्ञात महिलांनी हातचलाखीने कापडी पिशवीतील दीड लाख रुपयांची रक्कम लंपास केली. ही घटना दि. १८ रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. या प्रकरणी निर्मला मोहन भोसले यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक कृष्णा गुरव तपास करत आहेत.