
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी —–
सातारा. दि.२७. महिलेच्या विनयभंगासह तिला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ज्योतिबाची वाडी, तालुका सातारा येथे सातारा शहर परिसरात राहणाऱ्या महिलेस मारहाण तसेच तिचा विनयभंग केल्याप्रकरणी अंकुश परबती नरुळे आणि सुनील अंकुश नरुळे दोघे रा.जोतिबाची वाडी,ता.सातारा यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.