शैक्षणिकसातारा

“जावळीच्या डोंगर रानातून चमकला हिरा “सांगवी मुरा शाळेतील आर्यन शिंदेने मिळवले यशl

स्टार ११ महाराष्ट्र

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सांगवी मुरा शाळेतील आर्यन शिंदे ने मिळवले यशl

मेढा प्रतिनिधी. (अभिजीत शिंगटे)   जावली तालुक्यातील डोंगर कपारीत असणारे सांगवी मुरा या गावातील विध्यार्थी आर्यन शिंदे ने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत दणदणीत यश मिळवत प्रवेशासाठी पात्र ठरला असून त्याच्या या यशाने “जावलीच्या या डोंगर रानातून हिरा चमकल्याने” त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


डोंगर रानातून, माळरान,यातून अत्यंत अवघड असा प्रवास करावा लागणारा , निसर्गाचे वरदान असणारे सांगवी मुरा गाव आणि त्या गावात असणारी जिल्हा परिषदेची पाचवी पर्यंतची शाळा आणि या ठिकाणी शिक्षणाचे धडे देत असणारे कार्यरत मुख्याध्यापक श्री.बालाजी बोथिंगे गुरुजी आणि श्री.राजेंद्र शेडगे उपशिक्षक यांनी अथक परिश्रम घेऊन शाळा नावारूपास आणली आहेनुकताच जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून शाळेतील आर्यन शिंदे नवोदय विद्यालयात सहावी च्या वर्गात प्रवेशासाठी पात्र ठरला असून. आर्यनच्या यशामुळे त्याचे आई वडील, नातेवाईक भारावून गेले आहेत.

जावली तालुका शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच आघाडीवर असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक बालाजी बोथिंगे व राजेंद शेडगे सरांचे योग्य मार्गदर्शन, त्यांची विध्यार्थी प्रती असलेली तळमळ याचेच हे यश आहे .


श्री.रघुनाथ तानाजी दळवी
केंद्रप्रमुख

परिसरातील सर्वांसाठी आर्यन कौतुकाचा विषय ठरला आहे.
या वेळी आर्यनने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री तुकाराम शिंदे,सांगवी मुरा गावच्या माजी सरपंच सौ . सावित्रा शिंदे , शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ . संगिता झोरे, यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्य करीता शुभेच्छा दिल्या आणि उपस्थित मुख्याध्यापक बालाजी बोथिंगे, उपशिक्षक राजेंद्र शेडगे यांचे ही अभिनंदन केले तसेच विविध शैक्षणिक उपक्रम, क्रीडा क्षेत्रातील यश , नियमित अध्यापन तसेच जादा वेळ देऊन राजेंद्र शेडगे गुरुजींनी मुलांना मोडी लिपीचे ज्ञान देत असल्याचे सांगून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

सांगवी मुरा शाळेतील विध्यार्थी आर्यन याने अत्यंत खडतर परिस्थितीत एकाग्रतेने,चिकाटीने केलेला अभ्यास ,त्याला लाभलेले सुयोग्य मार्गदर्शन यामुळे त्याने मिळवलेले यश इतर विद्यार्थी यांना प्रेरणादायक आहे.


मुख्याध्यापक श्री बालाजी बोथिंगे

आर्यनच्या अभिनंदन प्रसंगी उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री तुकाराम शिंदे,सांगवी मुरा गावच्या माजी सरपंच सौ . सावित्रा शिंदे , शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ . संगिता झोरे, मुख्याध्यापक बालाजी बोथिंगे, उपशिक्षक राजेंद्र शेडगे सर शिक्षक मित्र व ग्रामस्थ .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!