शैक्षणिकसातारा

महाराष्ट्र दिनी समाजातील सर्व सामान्य घटकातील व्यक्तींना दिले मानाचे स्थान- मा. लक्ष्मणराव शेळके पाटील

स्टार ११ महाराष्ट्र


मेढा.दि.०३.  जि.प.प्राथ.शाळा बिरोबावस्ती (लोणंद) ता. खंडाळा येथे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके पाटील तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.


प्रारंभी माजी उपनगराध्यक्ष श्री.लक्ष्मणराव शेळके पाटील तात्या यांनी यावेळी स्वतःहून शाळेच्या स्वयंपाकी आत्या, दिव्यांग,ग्रामस्थ महिला व जेष्ठ नागरिक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व पालक यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन व श्रीफळ वाढविण्याचा मान दिला. यामधून एक उत्कृष्ट लोकनेता कसा असावा याची प्रचिती सर्व ग्रामस्थांना आली.


या नंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मुक्ताबाई धनावडे मॅडम यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. सूत्रसंचालन खिलारे सर यांनी केले.लोणंद शहारातील आदर्श व शैक्षणिक गुणवत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असलेली जि.प.प्राथमिक शाळा बिरोबावस्ती येथे अनेक ग्रामस्थानी शाळेसाठी मदतीचा हात दिला. यामध्ये ग्रामस्थांच्या मदतीने सीसीटीव्ही बसविण्यात आले. त्याचे उदघाटन तात्यांच्या हस्ते करण्यात आले.


शासनाच्या माझी लाडकी बहिण धरतीवर मुख्याध्यापिका सौ.धनावडे मॅडम यांनी जिल्हयात पहिला उपक्रम राबवून शाळेचा लाडका गुणवंत विद्यार्थी यास दीड हजार रुपये देण्यात आले.व पुढील वर्षाची बक्षीसाची रक्कम शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनपाल शेळके पाटील यांच्याकडे सुपूर्त केली.यापुढे शाळेच्या शिष्यवृतीधारक प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक हजार रुपये बक्षीस म्हणून डॉ. क्षितीज केसकर यांनी घोषित केले.तसेच प्रत्येक वर्गातून एक आदर्श विद्यार्थ्यांसाठी डोईफोडे सर यांनी बक्षीस जाहीर केले.
ह.भ.प. रामचंद्र रघुनाथ शेळके महाराज यांच्याकडून शाळेस स्पिकरचे दोन माईक व केबल भेट दिली. डोईफोडे सर यांच्याकडून शाळेला चार कॅमेरे भेट देण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र दिनी माजी उपनगराध्यक्ष तात्या यांच्यामुळे जि.प.शाळेत बक्षिसांचा पाऊस पडला.या कार्यक्रमाचे औचित्य साधून माझा लाडका गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थींनी तसेच शाळेतील अनेक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा मधून विजेते झालेल्या स्पर्धकांना बक्षिस देवून गौरव करण्यात आले. शाळेची गुणवत्ता पाहून ग्रामस्थांनी बक्षिसांचा वर्षाव केला असून ही अखंडीत यशाची परंपरा राखावी असे आवाहन तात्या यांनी केले.


या कार्यक्रमास अध्यक्ष धनपाल शेळके, उपाध्यक्ष दिपक क्षीरसागर, आणि सर्व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ बिरोबावस्ती आदी मान्यवर उपस्थित होते.आभार केसकर सर यांनी मानले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!