
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अभिजीत शिंगटे
मेढा. दि.३०.विश्वंभरबाबा आषाढी पायी दिंडी सोहळा 1996 साली सुरु झाला हा सोहला या वर्षी 27 व्या वर्षांत पदार्पण करीत आहे.
प्रा.वै.गुरुवर्य ह भ प भिकोबा महाराज देशमुख यांनी सर्व सामान्य जनतेला परमार्थाची आवड लागावी आपल्या तालुक्यात एक परमार्थाचे बिज रोवले जावे.व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा या साठी गोवोगावी जाऊन अखंड हरीनाम सप्ताहाची सुरूवात केली.तळागाळातल्या परमार्थाला उभारणी देऊन एक छत्राखाली आणण्यासाठी सर्व वारकरी मंडळींना एकत्र करून दिंडी सोहळ्याची स्थापना केली.हिच परंपरा पुढे जोपासण्याचे काम आज त्यांचे नातू ह भ प गुरूवर्य अतुलजी महाराज देशमुख करीत आहेत.
।।माझ्या वडिलांची मिरासी गां देवा । तुझी चरण सेवा पांडूरंगा।।या संतवचना प्रमाणे.दिंडी सोहळ्यात जावळी,वाई,महाबळेश्वर, सातारा, वडूज, बोरगाव, सांगली,पुनदी,वाघापूर आदी तालुक्यातील वारकरी मंडळींचा सहभाग असतो.विश्वंभरबाबा आषाढी पायी दिंडी सोहळा जावळी मेढा विभाग.या दिंडीचे प्रस्थान दि.21/06/2022 रोजी मेढा येथून आळंदीकडे होणार असून तद्संबधी विचार विनिमय मिटिंग श्री विठ्ठल मंदीर मेढा येथे सोमवार दि.23/05/2022 रोजी सकारात्मक विचारात पार पडली. यावेळी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष- श्री नारायण श्रिपती धनावडे मामुर्डी उपाध्यक्ष- अंजना काशीनाथ भोसले.विलास आबा पवार मेढा,शालिनी ताई गाडे,शिवराम महाराज मोरे,हरीभाऊ दादा वाईकर,गणेश भाऊ ईगावे.व इतर उपस्थित होते.तरी सर्वांनी दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावे व हरीनामाचा आनंद लूटावा.तसेच अन्नदान स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात सहकार्य करावे हि विनंती.
दिंडी सोहळा प्रमुख ह भ प गुरूवर्य अतुलजी महाराज देशमुख. गांजे यांनी केली आहे तरी ज्या कोणाला आर्थिक स्वरुपात वगैर मदत करावयाची आहे त्यांनी 8605596267/9423262033/8459898912 या मोबाईल नंबरवरती संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.



