मेढा सेंटर सोसायटीत तिरंगा ध्वज वाटप,वृक्षारोपण तसेच सैनिकाचा सहपत्नीक सन्मान

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – सुनिल धनावडे
मेढा. दि.११. मेढा सेंटर सोसायटीत तिरंगा ध्वज वाटप, वृक्षारोपण तसेच सैनिकाचा सहपत्नी सन्मान
जावळीची राजधानी मेढा येथे स्वतंत्र भारताचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मेढा सेंटर सोसायटी, मामुर्डी सोसायटी, सहाय्यक निबंधक कार्यालय जावळी, सातारा जिल्हा विभागीय कार्यालय मेढा यांचे संयुक्त विद्यमाने मेढा येथे वृक्षारोपण करणेत आले मेढा सेंटर सोसायटीचे आवारात जावळीचे कर्तव्यदक्ष तहसिलदार मा. राजेंद्रजी पोळ साहेब यांचे हस्ते पिंपळाचे झाड लावून वृक्षारोपण चा शुभारंभ करणेत आला.
तसेच सिक्किम येथे देशसेवा बजावत असलेले श्री मयुर नामदेव शेलार( मेढा) व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अंकिता नामदेव शेलार यांचे शुभ हस्ते सुद्धा वृक्षारोपण करणेत आले .
तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था,मेढा तालुका येथील कार्यालयाचे अधिकारी श्री.गणेश देशमुख साहेब व श्री.अक्षय चव्हाण साहेब, सातारा जिल्हा बॅकेचे विभागीय विकास अधिकारी श्री. अण्णासाहेब फरांदे साहेब, शाखा – मेढा शाखा विकास अधिकारी श्री. डी.के.दुर्गावळे साहेब मेढा सेंटर विकास सोसायटीचे चेअरमन श्री. सुरेश दळवी संचालकश्री. जितीन वेंदे सचिन जवळ युवा सेनेचे अध्यक्ष श्री. सचिन करंजेकर शिवसेना माजी तालुका प्रमुख संजय सुर्वे गटसचिवांचे सर्कलश्री. बापूसो धनावडे यांचे ही हस्ते प्रत्येकी एक झाड लावणेत आले.
जावळीचे तहसिलदार राजेंद्र पोळ तसेच सिक्किम येथे देशसेवा बजावत असलेले श्री मयुर नामदेव शेलार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अंकिता नामदेव शेलार यांचे शुभ हस्ते सोसायटीस तिरंगा ध्वज प्रदान करणेत आला मेढासेंटर सोसायटी सहाय्यक निबंधक कार्यालय सातारा जिल्हा बँक व मामुर्डी सोसायटी तर्फे कर्तव्यदक्ष तहसिलदार व फौजी मयुर यांचा सपत्नीक सत्कार करणेत आला.
मेढा सेंटर विकास सोसायटीचे सचिव श्री.सुनिल (आण्णा) धनावडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. लेखनिक सौ. निलम सुतार हिने आभार मानले.




