अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप सोहळ्याच्या निमित्तानेव्यसनमुक्त संघाचे १४ व १५ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रम

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज – युवराज धुमाळ
मेढा.दि.११.स्वातंत्र्योत्तर भारताचे अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप सोहळ्याच्या निमित्ताने व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दि.१४ व १५ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचेआयोजन करण्यात आले असल्याची माहिती व्यसनमुक्त युवक संघाचे प्रवक्ते विलासबाबा जवळ यांनी दिली.
युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्याध्यक्ष श्री दिपक जाधव यांच्या नेतृत्वात व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने स्वातंत्र्योत्तर भारताचे अमृत महोत्सवी वर्ष समारोप सोहळ्या निमित्ताने गेली वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतीकारक, देशभक्त यांच्या जन्मगावी पायी अथवा सायकल रॅली काढून मानवंदना दिली होती. यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील यांची जन्मभूमी येडेमच्छिंद्र, हुतात्मा बाबू गेनू यांच्या म्हाळुंगे पडवळ, क्रांतीवीर किसन वीर आबा यांचे कवठे, आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांचे जन्मगाव भिवडी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मगाव भगूर,क्रांतीकारक राजगुरू यांचे राजगुरूनगर, धर्मवीरगड ते तुळापूर, वढू ब्रु., राजगड ते रायगड, राणी लक्ष्मीबाई यांचे माहेरगाव धावडशी या ठिकाणी पायी पदयात्रा काढण्यात आल्या होत्या.तसेच, विविध ठिकाणी व्याख्याने, प्रबोधन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
समारोपाच्या निमित्ताने रविवारदि.१४ऑगस्ट रोजी दुपारी ३वा. फलटण येथील मनमोहन राजवाडा ते राष्ट्रबंधू राजीवजी दिक्षीत गुरुकुल अशी पायी पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत विविध देशभक्तीपर देखावे सादर करण्यात येणार आहेत.रात्री ८वाजता आ चंद्र सुर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे या विषयावर मा.अभय भंडारी यांचे व्याख्यान होणार आहे.
सोमवार ता.१५ रोजी सकाळी निष्ठावान वारकरी आप्पाजी शालीग्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू व अभ्यासक सात्यकी सावरकर यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान या विषयावर व्याख्यान, पांडुरंगभक्त अनिलकाका बडवे पंढरपूर यांचे आशिर्वचन, स्वातंत्र्य सेनानींचा सत्कार, महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत.या कार्यक्रमासाठी व्यसनमुक्त युवक संघाचे महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.





