महाराष्ट्रसातारासामाजिक

स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी ग्राम पंचायत गांजे यांनी तोडून टाकल्या कुरुढींच्या साखळ्या …

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संजय वांगडे

कुसुंबी प्रतिनिधी.दि.२२ आपला भारत देश अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे .
याप्रसंगी ग्रामसभेत विधवा अनिष्ठ प्रथा निर्मूलना चा ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आला आणि १५ ऑगस्ट पासून स्वयंपूर्ती ने विधवेने अनिष्ट प्रथेच्या अनिष्ठ रुढी पासून स्वतंत्र व्हावे असे आवाहन सरपंच लक्ष्मी चिकणे आणि ग्राम सेवक माने आण्णा यां नी केले .
पतीचे निधन ही स्त्री साठी अत्यंत दु:खदायक आणि दुदैवी घटना पतीच्या निधनाचे दुख: पचवत असतानाच तिला समाजात चालत आलेल्या विधवा अचारसंहितेमुळे सतत तिला आपण विधवा अनाथ – अभागी – असल्याची जाणीव होत असते .
समाजात वावरताना सण समारंभात तिची अवहेलना केली जाते,परंतु गांजे ग्राम पंचायतीने गावात विधवा प्रथेचे सामाजिक बंधन दूर करण्याचा एक प्रयत्न केला आहे.

स्वातंत्र्य दिना दिवशी ध्वज फडकवण्याचा मान ग्राम पंचायतीने एक विधवेला देवून क्रांती कारक कार्य केले आहे,गतकाळा होळी झाली धरा उद्याची उंच गुढी पुराण तुमचे तुमच्या पाशी ये उदयाला नवी पिढी .या वसंत बापट यांच्या कविते प्रमाणे ग्राम पंचायतीने हा ऐतिहासिक निर्णय घेतला असून गावातील सर्व लोकां नी नवीन दृष्टीकोन बाळगळ्यास आपण स्त्रीयांच्या आयुष्यातील दुख : दायक प्रसंगावर मायेची साथ आधार देण्याचे कार्य करावे .असे आवाहन ग्राम पंचायत वतीने करण्यात आले,शेकडो वर्षापासून या प्रथा चालत आलेल्या आहेत .त्या लगेच बदलत नाहीत .
परंतू चांगल्या गोष्टीची सुरुवात कोठून तरी व्हावी लागते . स्त्रीयांचे शिक्षण हा एके काळचा टिकेचा विषय पण आज १००% स्त्रीया शिक्षण घेत आहेत .
या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!