गुरुकुल कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट प्रशिक्षण केंद्राला राज्यस्तरीय आदर्श प्रशिक्षण केंद्र पुरस्कार प्रदान..

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सुनिल धनावडे
मेढा.दि.२१ जावळीची राजधानी मेढा येथील गुरुकुल कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट या प्रशिक्षण केंद्राला राज्यस्तरीय आदर्श प्रशिक्षण केंद्र पुरस्कार प्रदान करणेत आला दि.१४ ऑगष्ट रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झालेल्या AISF वैद्यकीय समिती महाराष्ट्र यांच्यावतीने ग्रामीण भागात संगणक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करणेत आला.

गेली १४ वर्षे गुणवत्ता जोपासणारे सातारा जिल्हयामध्ये जावली तालुक्यात उत्कृष्ट संस्था म्हणून गुरूकुलला आदर्श संगणक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्यस्तरीय २०२२ हा मानाचा पुरस्कार मिळाला.या पुरस्कार समारंभासाठी राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या आशाताई गजरे डॉ.राजश्री कटके Aisf वैद्यकीय समिती चे राज्याध्यक्ष डॉ.अमोल जाधव मान्यवराची उपस्थिती देण्यात आला.संगणक क्षेत्रामध्ये दर्जेदार शिक्षण देणे आणि विद्यार्थांना सर्वगुण संपन्न करणे हा आमचा हेतू आहे तसेच विद्यार्थी व पालक यांनी दाखविलेला विश्वास यामुळेच हे प्रमाणपत्र आम्हास मिळाले आहे असे गुरुकुल च्या सौ चव्हाण यांनी व्यक्त केले



