आरोग्य विषयीमहाराष्ट्रमुंबई व नवी मुंबईसातारा

तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेत पुरुष व महिला गटात आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय अव्वल स्थानावर

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज युवराज धुमाळ

मेढा दि.०७ सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत दि .३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे ज्युनियर कॉलेजचे १९ वर्षाखालील गटात खो – खो स्पर्धेत मुली व मुले यांनी प्रथम क्रमांक मिळविला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही संघाची निवड झाली.


मामुर्डी ता.जावली या ठिकाणी सदर स्पर्धा पार पडल्या असून स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री. तेजेस जाधव व शारीरिक शिक्षण संचालक प्रा.प्रमोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले .
महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी तसेच उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करुन त्यांना जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!