महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A ) पक्षाच्या वतीने कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी… किरण बगाडे

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज — युवराज धुमाळ
मेढा.दि.१२.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले त्या संविधानावरच संपूर्ण देश चालत आहे तरी अनेक महापुरुषांनी या देशासाठी बलिदान दिलेले आहे मात्र त्यांनी केलेल्या त्यागाची कोणतीही तमा न बाळगता चंद्रकांत पाटील महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करत आहेत.या बद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A ) सातारा यांच्या वतीने जावली तहसीलदार कार्यालय मेढा येथे निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

महात्मा ज्योतिराव फुले कर्मवीर भाऊराव पाटील डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामान्य माणसात शिक्षणाचे बीज पेरले आहे आणि शिक्षणाची क्रांती त्यांनी घडवून आणलेली आहे,त्यामुळे अशा महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलेले आहे.

त्यामुळे बहुजनांच्या भावना दुखावल्याने संबंधित चंद्रकांत पाटील यांचा तात्काळ पक्षश्रेष्ठींनी राजीनामा घ्यावा व वरिष्ठ पातळीवर पक्षश्रेष्ठींनी नोंद घ्यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A ) पक्षाच्या वतीने लोकशाहीतील मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपाईचे (A) जिल्हा सचिव किरण बगाडे यांनी दिला.व त्यांच्यावर महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कायदेशीर गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली.



